सुदेष्णा
सुदे्ष्णा ही विराट राजाची पत्नी व राणी होती. कीचक तिचा सख्खा भाऊ होता. सुदेष्णा व विराट राजाची कन्या उत्तरा हिचा विवाह अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू याच्याशी झाला होता. सुदेष्णा व विराट राजा यांना उत्तर नावाचा पुत्रदेखील होता.
द्रौपदीने अज्ञातवासामधे सुदेष्णा राणीच्या महालात सैरंध्रीची नोकरी पत्करली होती. द्रौपदीवर अतिप्रसंग करण्याच्या कीचकाच्या हेतूला सुदेष्णेने केवळ भयामुळे साथ दिली होती. पुढे कीचकाचा बेत फसला व त्याला भीमाने ठार केले.