Jump to content

सुजाता शेणई

सुजाता शेणई (जन्म १९६७) या मराठी विषयाच्या प्राध्यापिका, लेखिका, सूत्रसंचालक आहेत.

डॉ.सुजाता शेणई

शिक्षण

शेणई या एम.ए (मराठी) आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या साहित्य विशारद परीक्षेत त्या महाराष्ट्रात प्रथम आलेल्या होत्या.

त्यांनी पीएच.डी पदवी संपादन केली आहे. 'सुर्वे, महानोर, व ग्रेस यांची कविता - विशेष अध्ययन' हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. [] समीक्षक डॉ. रेखा इनामदार-साने यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

अध्यापन

शेणई या मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथे अध्यापन करतात.

अभ्यासमंडळ

त्या इयत्ता अकरावी व बारावी - महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ येथे मराठी विषयाच्या अभ्यासमंडळावर कार्यरत होत्या.

उपक्रम

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, अन्य पाच प्राध्यापकांच्या समवेत, ओंजळ या ऍपची निर्मिती केली. त्यास राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत पारितोषिक मिळाले.

पारितोषिके व पुरस्कार

बी.ए.ला पुणे विद्यापीठात मराठी विषयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे विद्यापीठाचे सुवर्णपदक त्यांना मिळाले आहे.

खालील संस्थांतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे.

  • पुणे महानगरपालिका
  • रोटरी क्लब
  • लायन्स क्लब
  • साहित्यदीप प्रतिष्ठान

लेखन व संपादन

पुस्तके

या तीन पुस्तकांमध्ये त्यांनी लेखन केले आहे व या तिन्ही पुस्तकांचे सह-संपादनही केले आहे.[]

लेखन

त्या विविध नियतकालिकामधून स्फुट लेखन करत असतात.[]

लेखमाला

मिळून साऱ्याजणी या मासिकामध्ये मराठी कवयित्रींच्या कवितेचा समीक्षात्मक वेध घेणारी सुजाता शेणई लिखित 'अक्षर अक्षर वेचू' ही लेखमाला प्रकाशित झाली होती.

संदर्भ

  1. ^ आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश, खंड ११, नाट्य खंड, संपादक - डॉ.विलास खोले.
  2. ^ उपयोजित मराठी (डॉ.गं.ना.जोगळेकर कृतज्ञताग्रंथ)
  3. ^ "आयुष्याची रंगीत गोधडी". Maharashtra Times. 2024-03-13 रोजी पाहिले.