सुचेता दलाल
सुचेता दलाल | |
---|---|
जन्म | मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | व्यवसाय पत्रकार आणि लेखिका |
जोडीदार | देबाशीस बसू |
पुरस्कार | पद्मश्री पुरस्कार |
सुचेता दलाल (१९६२:मुंबई, महाराष्ट्र - ) एक भारतीय व्यवसाय पत्रकार आणि लेखिका आहेत.[१] त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता केली आहे. १९९८ पर्यंत त्या टाइम्स ऑफ इंडियाच्या आर्थिक संपादक होत्या. त्यानंतर इंडियन एक्सप्रेस गटासह सल्लागार संपादक आणि इंडियन एक्सप्रेस आणि फायनान्शियल एक्स्प्रेससाठी २००८ पर्यंत स्तंभ लिहिले.[२][३][४]
२००६ मध्ये सुचेता यांनी मनीलाइफसाठी लिहायला सुरुवात केली. त्यांचे पती देबाशीस बसू यांनी सुरू केलेले हे गुंतवणुकीवरील पाक्षिक आहे. आता त्या मनीलाइफ मासिकाच्या व्यवस्थापकीय संपादक आहेत. २०१० मध्ये, भारतातील गरीब आर्थिक साक्षरतेला प्रतिसाद देत त्यांनी आणि त्यांच्या पतीने मनीलाइफ फाऊंडेशन ही मुंबई स्थित एक गैर-नफा संस्था स्थापन केली. त्या सहा वर्षांपासून कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधीच्या सदस्य आहेत.[५][६][७][८]
भारत सरकारने २००६ मध्ये पत्रकारितेतील योगदानाबद्दल पद्मश्री या चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांचा गौरव केला.[२] १९९२ मध्ये, त्यांना उत्कृष्ट महिला पत्रकारितेसाठी चमेली देवी जैन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[९][१०][११]
कारकीर्द
त्यांनी धारवाडच्या कर्नाटक महाविद्यालयामध्ये बीएससी सांख्यिकीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून ए.ल.ए.ल.बी. आणि ए.ल.ए.ल.एम. पदव्या मिळविल्या दलाल यांनी फॉर्च्युन इंडिया या गुंतवणूक नियतकालिकात पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली. नंतर त्यांनी बिझनेस स्टँडर्ड आणि द इकॉनॉमिक टाइम्स सारख्या वृत्त कंपन्यांमध्ये काम केले.[१२]
१९९० च्या दशकाच्या सुरुवातीला, दलाल मुंबईतील प्रसिद्ध वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यांच्या व्यवसाय आणि अर्थशास्त्र शाखेसाठी पत्रकार म्हणून सामील झाल्या. तेथे त्यांनी अनेक प्रकरणांची चौकशीपूर्ण माहिती पुरविल्यानेत्यांना प्रसिद्धी मिळाली. यांमध्ये १९९२चा हर्षद मेहता घोटाळा, एन्रॉन घोटाळा, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया घोटाळा, २००१ मध्ये केतन पारेख घोटाळा यांचा समावेश होतो. दलाल यांनी देबाशीस बसू, गिरीश संत, शंतनु दीक्षित आणि प्रद्युम्न कौल सारख्या पत्रकार आणि विश्लेषकांबरोबर काम केले. नंतर त्या टाइम्स ऑफ इंडियाच्या आर्थिक झाल्या.[१३]
पुरस्कार आणि मान्यता
- पद्मश्री पुरस्कार
- चमेली देवी पुरस्कार
- पत्रकारितेतील आवेशपूर्ण कार्यासाठी फेमिनाचा वुमन ऑफ सबस्टन्स पुरस्कार
संदर्भ
- ^ Mehrotra, Kriti (2020-11-11). "Where Is Sucheta Dalal Now?". The Cinemaholic (इंग्रजी भाषेत). 2021-09-15 रोजी पाहिले.
- ^ a b "Sucheta Dalal, Padma Shri - Express India". web.archive.org. 2016-03-22. रोजी मूळ पानापासून संग्रहित2016-03-22. 2021-09-15 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ Deepak, Sukant (2021-09-12). "Conversation with Sucheta Dalal: Grabbing the bull by its horns". National Herald (इंग्रजी भाषेत). 2021-09-15 रोजी पाहिले.
- ^ वृत्तसंस्था. "'आणखी एक घोटाळा...' असं सुचेता दलाल यांचं ट्विट अन् शेअर बाजारात खळबळ". Sarkarnama. 2022-03-05 रोजी पाहिले.
- ^ "बिकट वाट झाली वहिवाट". Loksatta. 2022-03-05 रोजी पाहिले.
- ^ team, abp majha web. "Sucheta Dalal : सध्या देशाची अर्थव्यवस्था ही चांगली आहे का वाईट? शोधपत्रकार सुचेता दलाल यांच्या सोबत 'माझा कट्टा'". ABP Marathi. 2022-03-05 रोजी पाहिले.
- ^ "'आणखी एक घोटाळा', सुचेता दलाल यांचे ट्विट आणि शेअर बाजारात घसरण". eSakal - Marathi Newspaper. 2022-03-05 रोजी पाहिले.
- ^ "Sucheta Dalal trended on the sudden fall in the shares of Adani Group |Adani Group के शेयर अचानक गिरे तो पत्रकार Sucheta Dalal ट्विटर पर हो गईं ट्रेंड; जानें मामला Hindi News, बिजनेस". zeenews.india.com. 2022-03-05 रोजी पाहिले.
- ^ Bhatia, Akanksha (2020-10-29). "Everything To Know About Sucheta Dalal, The Real Hero Of The Harshad Mehta Scam". www.scoopwhoop.com (English भाषेत). 2022-03-05 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Sucheta Dalal: Sources, Scams, Net Worth, Harshad Mehta". wealthquint.com (इंग्रजी भाषेत). 2021-09-02IST08:00:00+05:30. 2022-03-05 रोजी पाहिले.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ belgavkar.com. "belgavkar - 'एक ट्वीट की कीमत तुम क्या जानो...' | belgaum news | belgavkar marathi news | website design and software developement belgaum". Belgavkar belgaum news | belgavkar (इंग्रजी भाषेत). 2022-03-05 रोजी पाहिले.
- ^ "Journalist Sucheta Dalal trends on Twitter for the fall of Adani stocks; Adani group call reports 'erroneous'". Zee News (इंग्रजी भाषेत). 2021-06-14. 2021-09-15 रोजी पाहिले.
- ^ "Grabbing the bull by the horn". The Statesman (इंग्रजी भाषेत). 2021-09-07. 2021-09-15 रोजी पाहिले.