Jump to content

सुकन्या वर्गीय गस्ती नौका

सुकन्या वर्गीय गस्ती नौका[] या आकाराने मोठ्या, तटवर्गीय गस्ती नौका असून त्या भारतीय नौदलाच्या सेवेत आहेत.

सुकन्या वर्गाच्या या गस्ती नौकांना जुन्या महाकाव्यातील सुकन्या या प्रसिद्ध स्त्रीचे नाव देण्यात आले आहे. या वर्गात INS सुकन्या, आय.एन.एस. सुभद्रा, INS सावित्री, INS सुजाता, INS शारदा, व INS सुवर्णा या नौका आहेत.

सुकन्या वर्गीय या नौकांचा ढाचा आकाराने मोठा आहे, मात्र या नौका मुख्यत्वे भारताच्या खास आर्थिक क्षेत्रासाठी समुद्र तटांवर गस्त घालण्यासाठी असल्यामुळे यांच्यावर विशेष शस्त्रसाठा नाही. मात्र या नौका युद्धकाळात अधिक शस्त्रसाठा ठेवण्याच्या पात्रतेच्या असून गरजेच्या वेळी यांचा हलक्या लढाऊ नौका म्हणून वापर करता येतो. या वर्गातील आय.एन.एस. सुभद्रा व INS सुवर्णा या दोन नौकांचा धनुष या नौदलासाठीच्या वापराच्या प्रक्षेपास्त्र प्रणालीसाठी चाचणी स्तराची स्थापना करण्यासाठी वापर करण्यात आला आहे. वादळी अवस्थेतही क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता असलेल्या संतुलित मंचाचाही यात समावेश आहे.[]

या वर्गातील INS शरयू श्रीलंकेला विकत दिली गेल्यानंतर त्या नौकेचे नामकरण SLNS सयुरा असे झाले. ही नौका त्यानंतर यिंगी Y-82 या नौका-विरोधी क्षेपणास्त्र व पृष्ठभाग ते आकाश क्षेपणास्त्रांनी सुसज्ज करण्यात आली. सध्या ही नौका श्रीलंकेच्या नौदलाची ध्वजनौका असून या नौकेने बंडखोर तामिळी वाघांच्या नाविक दलाविरोधात उल्लेखनीय विजय मिळवले आहेत.

संदर्भ

  1. ^ भारतीय नौदलाचे संस्थळ
  2. ^ नौदल व वायुदलात "पृथ्वी" नियुक्त