Jump to content

सुंबरान साहित्य संमेलन

सुंबरान साहित्य परिषदेने भरविलेले सुंबरान साहित्य संमेलन पुणे शहरात १४ जुलै २०१३ रोजी झाले. अध्यक्ष(की उद्‌घाटक?) आमदार गणपतराव देशमुख होते. परिषदेचे अध्यक्ष डॉ तुकाराम पाटील, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अण्णा डांगे आणि माजी आमदार पोपटराव गावडे संमेलनाला हजर होते.

हे संमेलन मूलतः धनगर समाजाचे असल्याने त्यात पसार झालेले सर्व ठराव त्या समाजासंबंधी होते. उदा०

  • धनगर सनाजाला अनुसूचित जमातीत स्थान मिळावे
  • धनगरांनी ऊसतोडणी न करता मेंढीपालन करावे.
  • धनगर लेखकांनी कथा कादंबऱ्या न लिहिता पूर्वजांचा इतिहास शब्दबद्ध करावा. देशाचा इतिहास घडविणाऱ्या धनगर समाजाच्या इतिहासावर झालेली अतिक्रमणे दूर करावीत.
  • अहिल्यादेवी होळकरांचे एकही चरित्र मराठीत नाही (ही माहिती चुकीची आहे!), ते लवकरात लवकर प्रसिद्ध करावे. वगैरे.

पहा : मराठी साहित्य संमेलने