Jump to content

सी.ए. भवानी देवी

भवानी देवी
भवानी देवी
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव चदलावदा आनंद सुंदररामन भवानी देवी
टोपणनाव भवानी देवी
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थानभारत
जन्मदिनांक २७ ऑगस्ट, १९९३ (1993-08-27) (वय: ३१)
उंची सेमी
वजन किग्रॅ
खेळ
देशभारत
खेळ तलवारबाजी


चदलावदा आनंद सुंदररामन भवानी देवी ( २७ ऑगस्ट १९९३) ही एक तलवारबाज आहे. २०१८मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय होती. २०२१ च्या तोक्यो ऑलिंपिकसाठी ती पात्र ठरली आहे. ऑलिंपिक स्पर्धेत तलवारबाजी खेळात सहभागासाठी पात्र


ठरलेली ती पहिली भारतीय आहे.[] राहुल द्रविड अ‍ॅथलीट मेंटरशिप प्रोग्रामच्या माध्यमातून स्पोर्ट्‌स फाऊंडेशनद्वारे तिला मदत पुरविली जाते.

वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी

तामिळनाडूच्या चेन्नई येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात भवानीचा जन्म झाला. तिचे वडील पुजारी आहेत आणि तिची आई गृहिणी आहे.[] तिने आपले शालेय शिक्षण चेन्नईयेथील मुरुगा धनुषकोडी कन्या उच्च माध्यमिक शाळेतून पूर्ण केले आणि त्यानंतर चेन्नईतील सेंट जोसेफ अभियांत्रिकी महाविद्यालयात पुढचे शिक्षण घेतले. २००४ मध्ये तामिळनाडूतील शाळांमध्ये फेन्सिंग हा खेळ शिकवला जाऊ लागला, तेव्हा भवानीची या खेळाशी ओळख झाली.[] दहावी पूर्ण झाल्यानंतर तिने भारतीय फेन्सिंग प्रशिक्षक सागर लागू यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि आपले पुढील शिक्षण केरळमधील थॅलेसरी येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण (एसएआय) केंद्रात सुरू ठेवले. १४ वर्षांची असताना भवानी तुर्की येथे तिचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळली, मात्र सामन्यासाठी तीन मिनिटे उशिरा आल्याने तिला ब्लॅक कार्ड मिळाले. वक्तशीरपणाबाबत हा एक मोठा धडा आपल्याला मिळाला, असे ती सांगते.[]

व्यावसायिक यश

भवानी देवीने आपल्या प्रवासाची सुरुवात सांघिक स्पर्धांमध्ये पदक जिंकून केली. भारतीय तलवारबाजी संघाने 2009 मध्ये मलेशिया येथे आयोजित ज्युनियर कॉमनवेल्थ स्पर्धेत, २०१० साली थायलंडमध्ये आंतरराष्ट्रीय ओपन स्पर्धेत आणि फिलिपाईन्समधील २०१० च्या कॅडेट आशियाई स्पर्धेत कांस्यपदके पटकावली.[] २०१२मध्ये जर्सी येथील ज्युनियर कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये भवानीने पहिले वैयक्तिक कांस्यपदक जिंकले तर तिच्या संघाने रौप्यपदक जिंकले.[]

२०१४मध्ये फिलिपाईन्स येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत तिने स्वतःची कामगिरी सुधारत रौप्य पदकावर आपले नाव कोरले. अशी मजल मारणारी ती पहिली भारतीय ठरली.[] २०१४ च्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये मिळालेल्या यशासाठी तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी तिला अमेरिकेत प्रशिक्षणासाठी तीन लाख रुपये आर्थिक मदत देऊन तिचा गौरव केला.[] इथून पुढे तिने आपली कामगिरी आणखी उंचावतच नेली, आणि २०१४मध्ये इटलीमधील टस्कनी चषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.[]

‘गो स्पोर्ट्‌स फाऊंडेशन'द्वारे 'फाऊंडेशन’च्या राहुल द्रविड अ‍ॅथलीट मेंटरशिप प्रोग्रामसाठी २०१५ साली निवड करण्यात आलेल्या १५ खेळाडूंपैकी ती एक होती. [5] त्यावर्षी तिने मंगोलिया येथे झालेल्या अंडर-23 आशियाई चॅम्पियनशिपमध्ये आणि बेल्जियम येथील फ्लेमिश ओपन स्पर्धेत कांस्यपदके जिंकली.[]

रेक्याविक येथे आयोजित व्हायकिंग कप २०१६ आइसलँडिक आंतरराष्ट्रीय सेबर स्पर्धेत तिने पाचवे स्थान पटकावले. [6] २०१७मध्ये आइसलँड येथे आयोजित टूर्नोई सॅटलाईट डब्ल्यूसी फेन्सिंग स्पर्धेत भवानी देवीने सुवर्णपदक मिळवले. २०१८ मध्ये याच स्पर्धेत तिने रौप्य आणि कांस्यपदके जिंकली. याच वर्षी कॅनबेरा येथे झालेल्या सीनियर कॉमनवेल्थ फेंन्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय म्हणून तिने इतिहास रचला.[]

तिने आठ वेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे.[]

२०१९मध्ये टूर्नोई सॅटॅलाइट फेंन्सिंग स्पर्धेत महिला सेबर वैयक्तिक प्रकारात तिने रौप्य आणि कांस्यपदके जिंकली. मार्च २०२१ मध्ये ती जागतिक मानांकनात ४५व्या स्थानावर आहे,[]

पदके

  • ज्युनिअर कॉमनवेल्थ (राष्ट्रकुल) स्पर्धा - कांस्यपदक २००९ मलेशिया (सेबर- संघ)
  • कॅडेट आशियाई फेंसिंग अजिंक्यपद - कांस्यपदक २०१० फिलिपाईन्स (सेबर- संघ)
  • खुली आंतरराष्ट्रीय स्पर्धा - कांस्यपदक २०१०  थायलंड (सेबर- संघ)
  • ज्युनिअर कॉमनवेल्थ (राष्ट्रकुल) स्पर्धा - रौप्य पदक २०१२ जर्सी (सेबर- संघ)
  • कांस्यपदक २०१२ जर्सी (सेबर- वैयक्तिक)
  • 23 वर्षांखालील एशियन चँपियनशिप - रौप्य पदक २०१४ फिलिपाईन्स (सेबर- वैयक्तिक)
  • टस्कनी कप सुवर्ण पदक २०१४ फिलिपाईन्स (सेबर- वैयक्तिक)
  • अंडर 23 एशियन चँपियनशिप - कांस्यपदक २०१५ मंगोलिया (सेबर- वैयक्तिक)
  • फ्लेमिश ओपन -कांस्यपदक २०१५ बेल्जियम (सेबर- वैयक्तिक)
  • टूर्नोई सॅटॅलाइट डब्ल्यूसी फेन्सिंग स्पर्धा - सुवर्णपदक २०१७ रेक्याविक (सेबर-वैयक्तिक)
  • टूर्नाई सॅटॅलाइट डब्ल्यूसी फेन्सिंग स्पर्धा - सुवर्णपदक २०१८ रेक्याविक (सेबर- वैयक्तिक)
  • टूर्नाई सॅटॅलाइट डब्ल्यूसी फेन्सिंग स्पर्धा - रौप्य पदक २०१८ रेक्याविक (सेबर- वैयक्तिक)
  • सिनियर कॉमनवेल्थ (राष्ट्रकुल) फेन्सिंग स्पर्धा - सुवर्ण पदक २०१८ कॅनबेरा (सेबर- वैयक्तिक )
  • टूर्नाई सॅटॅलाइट डब्ल्यूसी फेन्सिंग स्पर्धा - रौप्य पदक २०१९ बेल्जियम (सेबर-  वैयक्तिक )
  • टूर्नाई सॅटॅलाइट डब्ल्यूसी फेन्सिंग स्पर्धा - कांस्यपदक २०१९ रेक्याविक (सेबर- वैयक्तिक)

पुरस्कार

  • अर्जुन पुरस्कार (२०२१)[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ a b "भवानी देवी ऑलिम्पिकसाठी पात्र". Loksatta. 2021-03-15. 2021-03-15 रोजी पाहिले.
  2. ^ a b January 11, P. T. I.; January 11, 2016UPDATED:; Ist, 2016 10:45. "Jaya announces sports scholarship, reward for students". India Today (इंग्रजी भाषेत). 2021-03-14 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  3. ^ a b venkataramana (2015-09-18). "Tamil Nadu fencer Bhavani talks about battling against the odds to succeed in a fledgling sport". www.sportskeeda.com (इंग्रजी भाषेत). 2021-03-14 रोजी पाहिले.
  4. ^ "Achievements". Bhavanidevi (इंग्रजी भाषेत). 2021-03-14 रोजी पाहिले.
  5. ^ a b "Tournoi Satellite Fencing: India's CA Bhavani Devi wins silver in sabre individual category after going down to Azerbaijan's Bashta Anna - Sports News , Firstpost". Firstpost. 2019-09-30. 2021-03-14 रोजी पाहिले.
  6. ^ "Sword of Bhavani Fetches Asian First". The New Indian Express. 2021-03-14 रोजी पाहिले.
  7. ^ "Will a Fencer's Sabre Strike Gold?". The New Indian Express. 2021-03-14 रोजी पाहिले.
  8. ^ a b "Chennai Newz » Go Sports Foundation Selected 15 athletes for Rahul Dravid Athlete Mentorship Programme". web.archive.org. 2016-06-03. 2016-06-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-03-14 रोजी पाहिले.
  9. ^ "National Sports Awards 2021 announced". pib.gov.in. 2021-11-20 रोजी पाहिले.