Jump to content

सीमा देव

सीमा देव
जन्मसीमा देव
२७ मार्च १९४२
मृत्यू २४ ऑगस्ट, २०२३ (वय ८१)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी

सीमा देव, माहेरचे नाव नलिनी सराफ[], (२७ मार्च, १९४२; मुंबई, महाराष्ट्र - २४ ऑगस्ट, २०२३) या एक मराठी अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांतून अभिनय केला आहे. मराठी अभिनेते रमेश देव त्यांचा पती असून अभिनेता अजिंक्य देव त्यांचा पुत्र आहे.

इ.स. १९५७ सालच्या आलिया भोगासी या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी भूमिका साकारलेले आनंद, जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, , या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे चित्रपट विशेष गाजले.

पुरस्कार

  • राजा परांजपे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार
  • पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफमधील) पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार. (२०१७)

मृत्यू

२४ ऑगस्ट २०२३ रोजी मुंबई येथे त्यांच्या राहत्या घरी उतार वयामुळे त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू समयी त्यांचे वय ८१ वर्षे होते.[] मृत्यू पूर्वी त्या अल्झायमर आजाराने ग्रस्त होत्या.[]

संदर्भ

  1. ^ दिलीप ठाकुर. "सुवासिनी". 2011-05-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १६ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "'आनंद'मूर्ती हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड". दैनिक लोकमत. २४ ऑगस्ट २०२३ रोजी पाहिले.
  3. ^ "Veteran Marathi Actress Seema Deo Suffering from Alzheimers Disease". Pune Times. 2020-10-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-08-24 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील सीमा देव चे पान (इंग्लिश मजकूर)