सीताराम नामदेव शिवतरकर
सीताराम नामदेव शिवतरकर | |
---|---|
जन्म | १५ जुलै १८९१[१][२] |
मृत्यू | २९ मार्च १९६६ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
ख्याती | समाज सेवा |
जोडीदार | विठाबाई (विवाह इ.स.१९१३), वेणूबाई (विवाह इ.स. १९१६) |
अपत्ये | चार मुले दोन मुली: शंकरराव सीताराम शिवतरकर |
वडील | नामदेव शिवतरकर |
सीताराम नामदेव शिवतरकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खाजगी चिटणीस, महाडच्या सत्याग्रहासाठी स्थापन झालेल्या बहिष्कृत हितकारिणी सभेच्या सत्याग्रह समितीचे सेक्रेटरी (इ.स. १९२७) आणि शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन पक्षाचे कार्यवाह होते. (या पदावरील कार्यकाळ हवा)[३][ दुजोरा हवा]
व्यक्तिगत जीवन
शिवतरकर हे इ.स १९०९ साली व्हरनॅक्युलर फायनलची परीक्षा पास झाले व परेलच्या प्राथमिक शाळेत शिक्षक झाले. सन १९२६मध्ये ते हेडमास्तर झाले आणि १९४९मध्ये निवृत्त झाले. १९१४ साली शिवतरकर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संपर्कात आले. आंबेडकरांच्या गैरहजेरीत सीताराम शिवतरकर आणि डी.डी. घोलप हे 'मूकनायक' साप्ताहिकाची जबाबदारी सांभाळत.
सामाजिक व राजकीय कारकीर्द
१९-२० डिसेंबर १९२७ महाड येथील आंबेडकरांच्या सभेच्या नियोजनात शिवतरकरांचा वाटा होता. नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहातही त्यांनी भाग घेतला होता (२ मार्च १९३०). शिवतरकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गोलमेज परिषदेसाठीच्यता भूमिकेचे समर्थन केले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि कोषाध्यक्ष होते. त्यांनी ६ आणि ७ मे १९३३ या कालावधीत अकोला येथे स्वतःच्या अध्यक्षतेखाली डिप्रेस्ड क्लासेस कॉन्फरन्स भरविली. ९ मे १९३३ रोजी कापुसतळणी येथे झालेल्या चांभार समाजाच्या सभेचे नेतृत्व केले. रोहिदास समाज पंचायतीची १९५२ मध्ये स्थापना करून १९६३ पर्यंत शिवतरकर तिचे अध्यक्ष राहिले.
सीताराम नामदेव शिवतरकर हे पुणे करारातील एक स्वाक्षरीदार होते (इ.स. १९३२). हिंदू धर्म त्यागण्याची आंबेडकरांची कल्पना आवडली नाही म्हणून शिवतरकरांनी आंबेडकरांचा पक्ष सोडला आणि ते काँग्रॆसमध्ये गेले. सन १९५२मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे आर.डी. भांडारे यांचा पराभव करून मुंबई विधानसभेत प्रवेश केला.
शिवतरकरांना आर्य समाजाबद्दल आणि आंबेडकरी दलित चळवळीबद्दल आस्था होती.
संदर्भ
- ^ https://books.google.co.in/books?id=_DMUdof3ZQMC&pg=PA200&lpg=PA200&dq=%22Sitaram+Shivtarkar%22&source=bl&ots=0AILg_JIlx&sig=YYqTv76vWZRZrajcIs7ASEbox7E&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwi_uIG1oLHVAhXLqI8KHSNbDsEQ6AEIMjAC#v=onepage&q=%22Sitaram%20Shivtarkar%22&f=false
- ^ https://books.google.co.in/books?id=Wx218EFVU8MC&pg=PA334&lpg=PA334&dq=%22Sitaram+Shivtarkar%22&source=bl&ots=8y3r2TWg5l&sig=svm6XxfTtx6gfHNGAeO-li0-q80&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwi_uIG1oLHVAhXLqI8KHSNbDsEQ6AEINjAD#v=onepage&q=%22Sitaram%20Shivtarkar%22&f=false
- ^ "Smrutinchya Hindolhyavar". www.bookganga.com. 2019-01-18 रोजी पाहिले.