Jump to content

सीताकांत महापात्र

सीताकांत महापात्र
जन्मसप्टेंबर १७, १९३७
भाषाउडिया, इंग्लिश
साहित्य प्रकारकविता, समीक्षा
पुरस्कारज्ञानपीठ पुरस्कार (१९९३)

सीताकांत महापात्र (सप्टेंबर १७, १९३७ - हयात) हे उडिया भाषेमधील कवी व समीक्षक आहेत.

महापात्रांचे १५ काव्यसंग्रह, ५ निबंधसंग्रह, १ प्रवासवर्णन व ३०हून अधिक स्फुट लेख प्रकाशित झाले आहेत. उडिया भाषेसोबत त्यांनी इंग्लिश भाषेतही लिखाण लिहिले आहे. १९७४ साली 'शब्दार आकाश' या काव्यसंग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला. १९९३ साली ज्ञानपीठ पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले.