सिलिका
सिलिका तथा सिलिकॉन डायऑक्साइड (SiO2) हे पृथ्वीवरील सर्वात प्रचलित खनिज आहे.[ संदर्भ हवा ] हे वाळूमध्ये असते. गारगोटी(क्वार्ट्झ)मध्ये सिलिकॉनचा एक अणू आणि ऑक्सिजनचे दोन अणू असतात. सिलिका प्राचीन काळापासून मनुष्यांना ज्ञात आहे. हा काचेचा एक मुख्य घटक आहे. सिलिकापासून काच बनवण्याची कला शतकांपूर्वीची आहे. आधुनिक काळात सिलिका ही abrasives, बांधकाम साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स, आणि पाणी गाळण्याची उपकरणॆ यांसारख्या अनेक औद्योगिक उत्पादनांत वापरतात.