सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट
सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट | |
---|---|
पक्षाध्यक्ष | पवनकुमार चामलिंग |
लोकसभेमधील पक्षनेता | None |
राज्यसभेमधील पक्षनेता | हिशे लाचुंग्पा |
स्थापना | ४ मार्च १९९३ |
मुख्यालय | गंगटोक, सिक्किम |
लोकसभेमधील जागा | ० / ५४५ |
राज्यसभेमधील जागा | १ / २४५ |
विधानसभेमधील जागा | १ / ३२ (सिक्कीम) |
राजकीय तत्त्वे | लोकशाही समाजवाद |
संकेतस्थळ | sikkimdemocraticfront.org |
सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (नेपाळी: सिक्किम प्रजातान्त्रिक मोर्चा) हा भारत देशामधील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. १९९३ साली स्थापन झालेल्या व प्रामुख्याने सिक्कीम राज्यात कार्यरत असलेल्या ह्या पक्षाचे मुख्यालय गंगटोक येथे आहे. १९९४ ते २०१९ दरम्यान सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट सिक्कीममध्ये सत्तेवर होता व पक्षाध्यक्ष पवनकुमार चामलिंग मुख्यमंत्रीपदावर होते. २०१९ सालापासून सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे प्रेम सिंह तमांग सिक्कीमचे मुख्यमंत्री आहेत.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2012-07-02 at the Wayback Machine.