सिंधुदुर्ग विमानतळ
सिंधुदुर्ग विमानतळ Sindhudurg Airport | |||
---|---|---|---|
आहसंवि: SDW – आप्रविको: VOSR SDW | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
स्थळ | सिंधुदुर्ग जिल्हा | ||
समुद्रसपाटीपासून उंची | २०३ फू / ६२ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 16°00′00″N 73°32′00″E / 16.00000°N 73.53333°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
०९/२७ | ८२०२ | २,५०० | डांबरी धावपट्टी |
सिंधुदुर्ग विमानतळ किंवा चिपी विमानतळ हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोकण समुद्र किनाऱ्यावरील मालवण आणि वेंगुर्ला या शहरांदरम्यान, चिपी-परुळे गावानजीकचे विमानतळ आहे. हे विमानतळ परुळे गावातील 'चिपी वाडी'मध्ये उभारले आहे. हा विमानतळ मुंबई -गोवा महामार्गापासून २७ किलोमीटर, आणि मालवणपासून १२ किलोमीटर अंतरावर आहे. २०१८ च्या उत्तरार्धात या विमानतळाचे बांधकाम पूर्ण झाले [१] आणि ५ मार्च२०१९ रोजी विमानतळाचे औपचारिक उद्घाटन झाले. [२] ९ ऑक्टोबर २०२१ रोजी व्यावसायिक उड्डाणे सुरू झाली [३]
या विमानतळावर २,५०० मीटर लांबीचा रनवे असून त्यावर रुंदीने कमी असलेली एरबस ए३२० आणि बोईंग ७३७ सारखी विमाने उतरू शकतात. विमानतळाची इमारत सुमारे ४०० विमान प्रवाशांची सोय करू शकते.
विमानसेवा व गंतव्यस्थान
विमान कंपनी | गंतव्य स्थान . |
---|---|
अलायन्स एर | मुंबई |
संदर्भ
- ^ "Maharashtra's Sindhudurg Airport may begin regular operations soon! First 'test flight' to land on Sep 12". The Financial Express (इंग्रजी भाषेत). 2018-09-08. 2021-10-12 रोजी पाहिले.
- ^ "Successful test flight lands at Sindhudurg Airport". pib.gov.in. 2021-10-12 रोजी पाहिले.
- ^ "Maharashtra CM Inaugurates Sindhudurg Airport, Flights to Mumbai Begin". News18 (इंग्रजी भाषेत). 2021-10-10. 2021-10-12 रोजी पाहिले.