Jump to content

सिंधुदुर्ग जिल्हा

सिंधुदुर्ग जिल्हा
सिंधुदुर्ग जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
सिंधुदुर्ग जिल्हा चे स्थान
सिंधुदुर्ग जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यमहाराष्ट्र
विभागाचे नावकोकण विभाग
मुख्यालयसिंधुदुर्ग नगरी ओरस
तालुके१.सावंतवाडी तालुका, २.कणकवली तालुका, ३ कुडाळ तालुका, ४. देवगड तालुुका ,५. दोडामार्ग तालुका, ६. मालवण तालुका,७. वेंगुर्ला तालुका, ८ वैभववाडी तालुका
क्षेत्रफळ
 - एकूण ५,२०७ चौरस किमी (२,०१० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ८,४८,८६८ (२०११)
-लोकसंख्या घनता१६३ प्रति चौरस किमी (४२० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या १२.६%
-साक्षरता दर८६.५४%
-लिंग गुणोत्तर१.०५ /
प्रशासन
-जिल्हाधिकारीश्री.किशोर तावडे
-लोकसभा मतदारसंघरत्नागिरी-सिंधुदुर्ग (लोकसभा मतदारसंघ)
-विधानसभा मतदारसंघसावंतवाडीकणकवलीकुडाळ
-खासदारविनायक राऊत
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ३,२८७ मिलीमीटर (१२९.४ इंच)
प्रमुख_शहरे मालवण, कणकवली
संकेतस्थळ


हा लेख सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र सिंधुदुर्ग नगरी, ओरोस ब्रुद्रुक येथे आहे. सिंधुदुर्ग हा सागरतटीय जिल्हा आहे. कोकणचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अप्पासाहेब पटवर्धन यांचा आश्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीजवळ गोपुरी येथे आहे. सिंधुदुर्गात मालवणी बोली बोलली जाते.

पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त (३८) किल्ले असणारा तसेच सर्व प्रकारचे म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे.

प्राचीन इतिहास

भगवान श्रीकृष्ण कालयवन या द्रविड राजास द्वारकेपासून हुलकावणी देत मुचकुंद राजाच्या गुहेत लपून बसले व कालयवनाचा वध झाल्यावर या जिल्ह्याच्या उत्तरेकडून घाट उतरून करवीरला गेले अशी आख्यायिका आहॆ. रामायणातही या प्रदेशाचा उल्लेख आहे. जिल्ह्यातील नेरूर येथे सापडलेल्या शिलालेखावरून या परिसरात चालुक्यांची सत्ता नांदली असा निष्कर्ष काढता येतो.

अर्वाचीन इतिहास

सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना १ मे, इ.स. १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधीचे नाव दक्षिण रत्‍नागिरी जिल्हा होते, ते बदलून सिंधुदुर्ग ठेवण्यात आले. शिवाजी महाराजांनी कुरटे बेटावर बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग ह्या जिल्ह्यात आहे. . १९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला.

चतुःसीमा

जिल्ह्यातील तालुके व नद्या

नद्या

मासेमारी

सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२१ किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे येथे भरपूर मासेमारी होते.

प्रमुख मासेमारी बंदरे (८) - आचरा, कोचरा, देवगड, मालवण, विजयदुर्ग, वेंगुर्ला, शिरोडा आणि सर्जेकोट

मच्छीमारांची संख्या - २५३६५

मत्स्यॊत्पादन - १९२७३ मेट्रिक टन. .

मच्छीमार सहकारी संस्था - ३४ (एकूण सभासद १४२१६)

हवामान

जिल्ह्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[]

फुले

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात तऱ्हेऱ्हेची रानफुले आढळतात. ही फुले म्हणजे वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक आणि पर्यावरण संवर्धकांसाठी अमूल्य ठेवा आहे. वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण गावंडे आणि निसर्ग अभ्यासक वामन पंडित यांनी सिंधुदुर्गातील रानफुलांची माहिती देणारी ‘१०० वेलीफुले’ ही पुस्तिका तयार केली आहे. तीत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आढळणाऱ्या सुमारे १०० वेलीफुलांची माहिती वाचायला मिळते. ही माहिती त्या फुलांच्या बाह्य स्वरूपाच्या वर्णनाबरोबरच खोड, पाने, पुष्पसंभार, फळे आदी शास्त्रीय तपशिलासह आहे.. पुस्तकात काही वेलीफुलांची रंगीत छायाचित्रे देण्यात आलेली आहेत. तसेच या वेलीफुलांच्या शास्त्रीय नावांप्रमाणेच त्यांची मराठी नावे, फुले-फळे येण्याच्या कालावधीविषयीही माहिती मिळते. मोरवेल, बेंदरीलची वेल, वासन वेल, कांगली, खांड वेल, गोमेटी, शेंगाळो, रवांतो, गारंबी, समुद्र अशोक, गावेल आदी लोकांच्या नेहमीच्या माहितीतल्या, तसेच बऱ्याचशा अज्ञात अशा वैशिष्ट्यपूर्ण वेलीफुलांची माहिती देणारे हे पुस्तक कणकवलीच्या पंडित पब्लिकेशन्सने प्रसिद्ध केले आहे.

प्रेक्षणीय स्थळे

  • आचरा खाडी (बॅकवाटर)
  • आंबोली - थंड हवेचे ठिकाण
  • कुणकेश्वर मंदिर (देवगड)
  • तेरेखोल किल्ला
  • देवगड किल्ला व दीपगृह
  • राजवाडा (सावंतवाडी)
  • मोतीतलाव, सावंतवाडी
  • विजयदुर्ग किल्ला
  • संत राऊळ महाराज मठ कुडाळ
  • पाट तलाव (पाट)
  • सावडाव धबधबा
  • सिंधुदुर्ग किल्ला
  • जय गणेश मंदिर मालवण
  • श्री दत्त मंदिर, माणगाव
  • धामापूर तलाव, धामापूर मालवण
  • यशवंतगड किल्ला, रेडी
  • पांडवकालीन द्विभूज गणपती, रेडी
  • वेंगुर्लाबंदर
  • वेंगुर्ला दिपगृह
  • मालवण रॉकगार्डन
  • पवनचक्की, देवगड
  • आई भराडीदेवी मंदिर,अंगणेवाडी

समुद्र किनारे

  • पुरळ, देवगड
  • मिठबांव, देवगड
  • तारामुंबरी, देवगड
  • आचरा, मालवण
  • तारकर्ली, मालवण
  • चिवला राजकोट, मालवण
  • वायरी, मालवण
  • देवबाग, मालवण
  • निवती, वेंगुर्ला
  • भोगवे, वेंगुर्ला
  • खवणे, वेंगुर्ला
  • केळुस मोबार, वेंगुर्ला
  • रेडी, वेंगुर्ला
  • वेंगुर्लाबंदर
  • सागरेश्वर, वेंगुर्ला
  • शिरोडा, वेंगुर्ला
  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.