Jump to content

सिंधुताई जोशी

सिंधुताई जोशी यांचा जन्म २ ऑक्टोंबर १९१६ रोजी पुण्यात झाला. सिंधुताईच्या आईवडील दोघांनाही समाजसेवेची आवड होती. गांधर्व महाविद्यातून त्या संगीत विशारद झाल्या. १९४५ नंतर सिंधुताई सामाजिक कार्यात रस घेऊ लागल्या १९४५ ते १९५० पाच वर्ष त्यांनी दादर भगिनी समाज या संस्थेत कार्यवाह म्हणून काम केले. कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेचा त्यांनी सामाजिक कार्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला. मानसशास्र विषय घेउन् पुन्हा बी.ए.ची पदवी मिळवली. रोशन मास्टर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सुधार केंद्रात (रिमांडहोम) मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम सुरू केले.