Jump to content

सिंधुघोष वर्गाच्या पाणबुड्या

सिंधुघोष वर्गाच्या पाणबुड्या भारतीय आरमाराच्या पाणबुड्यांपैकी एक प्रकारच्या पाणबुड्या आहेत. यांची रचना किलो वर्गाच्या पाणबुड्यांवर आधारित आहे. या डीझेल-विद्युच्चलित पाणबुड्या १९८६पासून आरमारी सेवेत आहेत.

या पाणबुड्या रोसोवूरुझेनी या रशियन कंपनीने भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसार बनविल्या. झ्वेझदोच्का गोदीमध्ये बांधण्यात आलेल्या या पाणबुड्या प्रॉजेक्ट ८७७ या संकेतनावाखाली बनविण्यात आल्या. यांची साधारण क्षमता ३,००० टन असून या ३०० मीटर खोलपर्यंत बुडी मारू शकतात. पाण्याखाली १८ नॉटच्या वेगाने सरकू शकणाऱ्या या पाणबुड्या ५३ खलाशी व अधिकारी घेउन सतत ४५ दिवस पाण्याखाली एकांड्या मोहिमेवर राहू शकतात.

पाणबुड्या

यांची नावे संस्कृतमध्ये ठेवण्यात आलेली आहेत.

नाव संकेत क्रमांक कंत्राटदार घर सेवासुरुवात सद्यपरिस्थिती
आयएनएस सिंधुघोष S55 सेव्हमाश,
सेव्हेरोद्विन्स्क
एप्रिल ३०, इ.स. १९८६२००२-२००५ दरम्यान झ्वेझदोच्का गोदीमध्ये पुनर्बांधणी
आयएनएस सिंधुध्वज S56 सेव्हमाश जून १२, इ.स. १९८७
आयएनएस सिंधुराज S57 सेव्हमाश ऑक्टोबर २०, इ.स. १९८७१९९९-२००१ दरम्यान झ्वेझदोच्का गोदीमध्ये पुनर्बांधणी
आयएनएस सिंधुवीर S58 सेव्हमाश ऑगस्ट २६, इ.स. १९८८१९९७-१९९९ दरम्यान झ्वेझदोच्का गोदीमध्ये पुनर्बांधणी
आयएनएस सिंधुरत्न S59 सेव्हमाश डिसेंबर २२, इ.स. १९८८२००१-२००३ दरम्यान झ्वेझदोच्का गोदीमध्ये पुनर्बांधणी
आयएनएस सिंधुकेसरी S60 सेव्हमाश फेब्रुवारी १६, इ.स. १९८९१९९९-२००१ दरम्यान झ्वेझदोच्का गोदीमध्ये पुनर्बांधणी
आयएनएस सिंधुकीर्ती S61 सेव्हमाश जानेवारी ४, इ.स. १९९० 4 January 1990 विशाखापट्टणम येथे २००७पासून पुनर्बांधणी
आयएनएस सिंधुविजय S62 सेव्हमाश मार्च १८, इ.स. १९९१२००५-२००७ दरम्यान झ्वेझदोच्का गोदीमध्ये पुनर्बांधणी
आयएनएस सिंधुरक्षक S63 सेव्हमाश डिसेंबर २४, इ.स. १९९७२०१०-२०१२ दरम्यान झ्वेझदोच्का गोदीमध्ये पुनर्बांधणी
ऑगस्ट १४, इ.स. २०१३ रोजी मुंबईला असताना स्फोट होउन बुडाली
आयएनएस सिंधुशस्त्र S65 सेव्हमाश जुलै १९, इ.स. २०००

अपघात

जानेवारी १०, इ.स. २००८ रोजी सिंधुघोष आणि मालवाहू नौका एमव्ही लीड्स कॅसलची टक्कर झाली. सिंधुघोषच्या कॉनिंग टॉवरचे किरकोळ नुकसान झाले व त्यानंतर एक महिना दुरुस्तीत होती.[]

फेब्रुवारी २६, इ.स. २०१० रोजी सिंधुरक्षकमधील सदोष बॅटरीमुळे आग लागली व त्यात एक खलाशी मृत्यू पावला व इतर दोन जखमी झाले.[] ऑगस्ट १४, इ.स. २०१३ रोजी सिंधुघोषमध्ये स्फोट झाला व त्यानंतर मोठी आग लागली. यात अनेक खलाशी व अधिकारी मृत्यू पावल्याची भीती आहे. यानंतर सिंधुरक्षक बुडाली. ही पुन्हा वापरात येण्याची शक्यता नहिवत आहे.[] जवळच उभी असलेल्या सिंधुरत्नचेही त्यावेळी किरकोळ नुकसान झाले.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "पाणबुडीच्या टकरी वृत्त". 2007-07-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-07-28 रोजी पाहिले.
  2. ^ "सिंधुरक्षकवरील आगीत एक शहीद". 2010-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-08-16 रोजी पाहिले.
  3. ^ "मुंबई बंदरात भारतीय पाणबुडीवर स्फोट". 14 August 2013 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

चित्रदालन