सिंगमन ऱ्ही
सिंगमन ऱ्ही | |
दक्षिण कोरियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष | |
कार्यकाळ २४ जुलै इ.स. १९४८ – २६ एप्रिल इ.स. १९६० | |
मागील | - |
---|---|
पुढील | यून बॉ-सिऑन |
जन्म | २६ मार्च १८७५ हैजू, चोसून (आजचा उत्तर कोरिया) |
मृत्यू | १९ जुलै, १९६५ (वय: ९०) होनोलुलू, हवाई, अमेरिका |
गुरुकुल | हार्वर्ड विद्यापीठ प्रिन्स्टन विद्यापीठ |
सही |
सिंगमन ऱ्ही (कोरियन: 이명박; २६ मार्च १८७५ - १९ जुलै १९६५) हा स्वतंत्र दक्षिण कोरिया देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. त्यापूर्वी कोरियन द्वीपकल्प जपानी अधिपत्याखाली असताना चीनमधून चालवल्या जाणाऱ्या अस्थायी सरकारचा तो पहिला अध्यक्ष होता.
अनेक वर्षे अमेरिमेमध्ये राहिलेला ऱ्ही १९४५ साली दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाल्यानंतर कोरियामध्ये परतला. १९४८ साली तो राष्ट्राध्यक्षपदावर निवडुन आला व पुढील १२ वर्षे तो ह्या पदावर होता. प्रभावशाली व कट्टर कम्युनिस्टविरोधी असलेल्या ऱ्हीने कोरियन युद्धादरम्यान दक्षिण कोरियाचे नेतृत्व केले.