Jump to content

साहित्य समन्वय (अनियतकालिक)

‘‘‘साहित्य समन्वय’‘‘ हे कर्नाटक राज्यातून प्रकाशित होणारे मराठी अनियतकालिक आहे.

हे अनियतकालिक गेली तीस वर्ष सातत्याने प्रकाशित होत आहे. कर्नाटक राज्यातून प्रकाशित होत असलेले, ‘तौलनिक साहित्याभ्यासाला वाहिलेले’ आणि गेली तीस वर्ष विनामूल्ये भारतातील बहुतेक सर्व ठिकाणी वितरीत होत असलेले एकमेव मराठी वाङ्मयीन अनियतकालिक असावे.

मराठी साहित्याबरोबर दर्जेदार अनुवादित साहित्याला संपादक मंडळ प्राध्यान्य देत आहे. साहित्य समीक्षा, कथा, अनुभव कथन,लेख,अभिप्राय आणि साहित्य समन्वयकडे आलेल्या पुस्तकांची नोंद घेण्याची परंपरा ‘साहित्य समन्वय’ची आहे. 

डॉ. एस.पी, पाटील, प्रा. सुरेश सोनटक्के, डॉ.विष्णू वासमकर, प्राचार्य सुबराय देसाई हे संपादक मंडळातील सदस्य आहेत, तर डॉ.भा.वा.आठवले, डॉ.सी.आर.येरविनतेलीमठ हे सल्लागार आहेत. डॉ.गो.मा.पवार हे साहित्य समन्वयचे खूप वर्ष सल्लागार होते. संपादक:सौ.सुमन गायकवाड आणि कार्यकारी संपादक: डॉ. बाबुराव गायकवाड कर्नाटक राज्यातील धारवाड येथून हे अनियतकालिक प्रकाशित करतात.