सावरगाव बर्डे
सावरगाव बर्डे सावरगाव बर्डे हे गाव दिल्ली ते चन्नई या रोड वर महाराष्ट्रातील विदर्भ प्रांतातील अकोल्या पासून ७० कि. मि. अंतरावर वाशीम पासून १० कि. मि. अलीकडे आहे. सावरगाव बर्डेचा तालुका जिल्हा वाशीम असून पोस्टल पिन कोड नंबर ४४४५०५ आहे तसेच फोन कोड ०७२५२ हा आहे. यागावत खडकेश्वर महादेवाचे मंदिर ,हनुमानाचे मंदिर ,शेनल्याच्या आईचे मंदिर ,तसेच इतरही हिंदूची तीर्थ स्थळे आहेत.बुद्धांची अतिशय सुंदर मूर्ती आहे . सावरगाव याठिकाणी आलेल्या खड्केश्वराच्या दर्शनास्थ प्रभू रामचंद्र सीतामाता तसेच बंधू लक्ष्मण तपोवन दर्शना नंतर आले होते अशी आख्यायिका आहे . यागावा मध्ये हिंदू , बौद्ध , मुस्लिम, अश्या विविध धर्माची लोक एकत्र सुखाने नांदतात . यागावा मध्ये पाटील, कड, बर्डे , शेळके,गोटे,कुटे ,सरकटे,जाधव,शेख,लबडे,हिवाळे, इत्यादी आडनावाचे लोक राहतात. सावरगाव बर्डेची लोकसंख्या २००१ जनगणना नुसार १५३५ एवढी होती परंतु आज(२०१५) साधारण पने २००० एवढी असेल मतदार संख्या १४५० इतकी आहे. सावरगाव बर्डे इथून तामसी ,धारकाटा ,खडकी,जाभरून परांडे,काटा,पांगरी नवघरे ,जाभरून वाडी ,चीवरा,इत्यादी गावांना जोडणाऱ्या पायवाटा तसेच गाडवाटा आहेत. या ठिकाणी विजय सुभाष पाटील यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सोयी साठी. " मातोश्री श्रीमती लक्ष्मीबाई सुभाषराव जी पाटील बहुउद्देशीय शिक्षण संस्था सावरगाव बर्डे ता. जि. वाशीम ." ही संस्था स्थापन केली याद्वारे२००९ साली" माऊली ज्ञान मंदिर पूर्व प्राथमिक इंग्रजी शाळा " सुरू केली .य़ा परंतु ती शाळा दोन वर्ष सुरळीत चालल्या नंतर तिसऱ्या वर्षी काही अपरिहार्य कारणाने बंद केली. मात्र शिक्षणाचा वसा पुढे सुरू ठेवीत २०१२ साली यागावा मध्ये "माऊली कॉम्पुटर्स सावरगाव बर्डे " सुरू करून कॉम्पुटरचे असे नव नवीन अभ्यासक्रम आणले . ठिकाणी इयत्ता पहिली पासून तर आठवी पर्यंत शिकण्यासाठी जिल्हा परिषदेची शाळा असून पुढील शिक्षणा साठी गावापासून अर्धाकिमी अंतरावर संमती इंजिनीअर कॉलेज असून तेथे अभियांत्रिकी पदवी (BE) 1 स्थापत्य अभियांत्रिकी 2 संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी 3 विद्युत अभियांत्रिकी 4 इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार इंजिनियरिंग 5 मेकॅनिकल इंजिनिअरिंग . वकिली , वाणिज्य , इत्यादी क्षेत्रे आहेत . सावरगाव बर्डे हे गाव आजही पांडुरंग पाटील यांचे म्हणून ओळखले जाते . पांडुरंग पाटील हे सावरगाव बर्डे यथे १९१३ साली सर्वसाधारण कुटुंबात जन्माला येऊन, जास्त शिक्षण नसूनही त्यांनी स्वातंत्र्याच्या कार्यात सहभाग घेतला. महाराष्ट्र स्थापणे नंतर सावरगाव बर्डेचे ते पाच वर्ष सरपंच राहिले.