Jump to content

सावनी शेंडे

सावनी शेंडे
आयुष्य
जन्म स्थान पुणे,महाराष्ट्र.
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
देश भारत
भाषा मराठी, हिंदी
पारिवारिक माहिती
वडील डॉ. संजीव शेंडे
नातेवाईक कुसुम शेंडे (आजी)
संगीत साधना
गुरू कुसुम शेंडे, डॉ. संजीव शेंडे
गायन प्रकार भारतीय शास्त्रीय संगीत
संगीत कारकीर्द
पेशा भारतीय शास्त्रीय संगीत

सावनी शेंडे-साठ्ये ही एक आघाडीची शास्त्रीय संगीत गायिका आहे.

बालपण

सावनीचा जन्म ऐन श्रावण महिन्यातील असल्याने तिचे नाव सावनी ठेवले. गाणाऱ्या घराण्यात त्यांचा जन्म झाला. सावनी शेंडे आपल्या आजीकडून म्हणजे किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका 'कुसुम शेंडे' यांच्याकडून रीतसर संगीत शिकल्या. ठुमरीचे राग त्या वेगाने शिकल्या. ठुमरीसाठी हिंदी लहेजा, नजाकत महत्त्वाची असते. ती त्यांनी आत्मसात केली. प्रसिद्ध गायिका वीणा सहस्रबुद्धे यांच्याकडेही त्यांनी संगीताचे धडे घेतले. त्यामुळेच त्यांच्या गायनात किराणा-ग्वाल्हेर गायकीचा संगम आहे.

कारकीर्द

ती १२ वर्षाची असताना सावनीला थेट राष्ट्रपतींसमोर गायचा योग आला होता. दिल्लीत पंडित पलुस्कर महोत्सव मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जातो. गानगुरू कै. वसंत ठकार यांनी या महोत्सवाच्या संयोजकांना सावनीचे नाव सुचवले होते. त्यानुसार तिचे गायन दिल्लीत झाले. तत्कालीन राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्यासमोर आणि सर्व केंदीय मंत्र्यांसमोर तिने आपली गायकी पेश केली.

त्यानंतर पुढील काळात तिचे शास्त्रीय संगीत गायनाचे अनेक सार्वजनिक कार्यक्रम झाले..

"झाले मोकळे आकाश' या मालिकेचे शीर्षकगीत सावनी यांनी गायले आहे. त्यासाठी त्यांना "रापा इंटरनॅशनल पुरस्कार' मिळाला आहे.

"हृदय स्वर' हे त्यांचे एक पुस्तकही प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात त्यांनी स्वतः रचलेल्या काही बंदिशी आहेत.

गायन केलेले चित्रपट

  1. कैरी (मराठी चित्रपट)
  2. सावली (मराठी चित्रपट)

पुरस्कार

  1. "इंडियन रेकॉर्डिंग आर्ट्‌स ॲकॅडमीतर्फे' प्रसिद्ध गायिका सावनी शेंडे यांना उदयोन्मुख कलाकार पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
  2. पंडित जसराज गौरव पुरस्कार.
  3. माणिक वर्मा मेमोरिअल ॲवॉर्ड.
  4. "पुणे की आशा' ॲवॉर्ड.
  5. स्वरोन्मेष पुरस्कार.
  6. विश्व संगीतरत्‍न ॲवॉर्ड.
  7. पं. रामकृष्णबुवा वझे ॲवॉर्ड.
  8. "रापा' नॅशनल ॲवॉर्ड.

सावनी शेंडे यांचे झालेले प्रमुख कार्यक्रम

  1. वयाच्या बाराव्या वर्षी राष्ट्रपती भवनात कार्यक्रम.
  2. तानसेन संगीत संमेलन, ग्वाल्हेर.
  3. अल्लादियाखाँ संगीत सभा, मुंबई.
  4. पं. कुमार गंर्धव कॉन्फरन्स, देवास.
  5. सवाई गंधर्व महोत्सव, पुणे.
  6. अमेरिका व कॅनडा येथे कॉन्सर्ट.
  7. झुरिच येथे दोन कॉन्सर्ट.