Jump to content

साल्हेरची लढाई

साल्हेरची लढाई १६७२मध्ये नाशिक जिल्ह्यातील साल्हेर गावाजवळ झालेली ही लढाई होती. मुघल साम्राज्य आणि मराठा साम्राज्यांमध्ये झालेल्या लढाईत मराठ्यांचा निर्णायक विजय झाला,पण आनंदाच्याबरोबर युद्धातील विजय दुःख घेऊनच येतो. या युद्धात महाराजांचा एक अत्यंत आवडता, शूर जिवलग सूर्याजी काकडे हा मारला गेला. महाराजांना अपार दुःख झाले. त्यांच्या तोंडूनउद्गार बाहेर पडले, ' माझा सूर्याराऊ पडिला. तो जैसा महा भारतातील कर्ण होता.

सरनौबत प्रतापराव गुजर आणि पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मुघलांविरुद्ध खुल्या मैदानावर मिळवलेला हा पहिला विजय होता.[]


पुरंदरच्या तहानंतर सन (१६६५) छत्रपती  महाराजांना २३ किल्ले मुघलांना द्यावे लागले त्यामध्ये राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे सिंहगड , पुरंदर , लोहगड, कर्नाळा, माहुली मुघलांकडे गेले. पुरंदरच्या तहानुसार शिवाजी राज्यांना  आग्राला दरबारात जावे लागले परंतु औरंगजेब ने त्यांना कैदी करून घेतले त्यातून शिवाजी राजांनी चातुर्याने आपली सुटका संप्टेंबर  १६६६ मध्ये  करून घेतली ही आजतागायत सर्वत्र खूप प्रसिद्ध आहे. त्यानंतर  औरंगजेबने हिंदुविरोधी   मोहीम हाती घेतली विश्वनाथ आणि बेणारे मंदिर पाडले . आणि ह्याचा परिणाम आणि प्रतीउत्तर शिवाजी महाराजांनी देयाला सुरुवात केली आणि मुघला विरुद्ध युद्धमोहीम हाती घेतली.१६७० नंतर युद्ध अश्या आणेल मोहिमा यशस्वी पार पडल्या. त्यामधील हे साल्हेर युद्ध.या यद्धात सरदार सुर्याजी काकडे यांना वीरमरण प्राप्त झाले.


मराठीत भाषांतरित-प्रवीण पवार

संदर्भ

  1. ^ Y.G. Bhave (2000). From the Death of Shivaji to the Death of Aurangzeb. Northern Book Centre. p. 42.

2. https://en.wikipedia.org/wiki/Battle_of_Salher