साल्फेल्ड
साल्फेल्ड जर्मनीच्या थुरिंजिया प्रांतातील शहर आहे. २०१८ च्या शेवटी येथील लोकसंख्या २९,४५७ होती.
इतिहास
१० ऑक्टोबर, १८०६ रोजी येथे झालेल्या लढाईत फ्रांसचा विजय झाला होता. हे शहर जर्मनीतील वेटिन घराण्याच्या सॅक्स-कोबुर्ग गोथा पातीचे मूळ गाव आहे. सॅक्स-कोबुर्ग गोथाने १९१७मध्ये आपले नाव बदलून हाउस ऑफ विंडसर केले. हे घराणे त्यावेळी युनायटेड किंग्डमचे राजघराणे होते.