सालोटा किल्ला
सालोटा | |
नाव | सालोटा |
उंची | 4200Ft . |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | |
डोंगररांग | |
सध्याची अवस्था | |
स्थापना | {{{स्थापना}}} |
सालोटा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
भौगोलिक स्थान
कसे जाल ?
गडावर जाण्याचे तीन मार्ग आहेत.
१) वाघांबे मार्गे :- साल्हेरला जाण्यासाठी नाशिक - सटाणामार्गे ताहराबाद गाठावे. गुजरातमधून यायचे झाल्यास डांग जिल्हयातून ताहराबादला जाण्यास रस्ता आहे. ताहराबादहून मुल्हेरमार्गे वाघंबे अशी एसटी अथवा जीप सेवा देखील उपलब्ध आहे. वाघंबे गाठल्यावर गावातूनच साल्हेर-सालोटा यांच्या खिंडीतून साल्हेरला जाणारी वाट आहे. वाटेत कुठेही पाणी नसून खिंडीपर्यंत चालणारी वाटचाल दमछाक करणारी आहे. या वाटेने गडावर जाण्यासाठी साधारण अडीच तास लागतात.
२) माळदर मार्गे:- गडावर जाण्यासाठी असलेली ही वाट फारशी वापरात नाही. ही वाट माळदर गावतूनच जाते. सटाण्याहून एसटीने माळदरला जाता येते. ही वाट साल्हेर व सालोटा यांच्या दरम्यानच्या खिंडीमधून जाते. या वाटेने गडावर जायला साधारण तीन तास लागतात.
३) साल्हेरवाडी मार्गे:- साल्हेरवाडी हे गाव वाघंबे गावाच्या पुढे आहे. साल्हेरवाडीला दोन मार्गांनी जाता येते. एक सटाणा - ताहराबाद - मुल्हेर - साल्हेरवाडी असा आहे. साल्हेरवाडीहून गडावर जाणारी वाट दमछाक करणारी आहे. या वाटेने सहा दरवाजे पार करून सुमारे तीन तासांनी आपण गडावर पोहोचतो. वाट मळलेली असल्याने चुकण्याची शक्यता नाही. या वाटेत कुठेही पाणी नाही.
इतिहास
छायाचित्रे
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
एक तलाव दोन टाकी त्रिमुखी मारुती मंदिर गडकुलदेवी मंदिर
गडावरील राहायची सोय
गडावर पूर्वी राहण्याची सोय होती परंतु आता गडच्या काही बाजू कोसळत आहे आणि इथे बिबटे अशा जंगली प्राण्याचा वावर आहे म्हणून राहणे टाळावे. जवळच्या साल्हेर व वाघांबे गावात आपण मुक्काम करू शकता Ig.@sagar_camera
गडावरील खाण्याची सोय
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही. आपण स्वतः करावी
गडावरील पाण्याची सोय
गडावर 1 आयताकृती तलाव व 2 प्रशस्त टाकी आहेत 10 महिने इथे पाणी असते पण उन्हाळ्यातील 3 4 महिने पाण्याची पातळी खाली जाते. तेव्हा पाणी सोबत घेऊन जावे.
गडावर जाण्याच्या वाटा
एक वाट साल्हेर वाडी गावातून साल्हेर किल्यावर जाते व साल्हेर उतरून आपण सालोटा किल्ल्यावर जाऊ शकतो.
दुसरी वाट वाघांबे गावातून जाते ती आपल्याला सालोटा व साल्हेर या दोन्ही किल्ल्याच्या मध्यभागी घेऊन येते
तिसरी वाट म्हणजे माकड नाळ ही वाट पण आपल्याला सालोटा व साल्हेर या दोन्ही गडाच्या मध्यभागी घेऊन येते. ही वाट एका धबधब्यातून आहे adventure हवा असल्यावर येथून यावे
मार्ग
जाण्यासाठी लागणारा वेळ
वाघांबे गावातून आपण चढाई सुरू केली तर साल्हेर व सालोटा हे 2nhi किल्ले आपण येऊन जाऊन 8 तासात पूर्ण करू शकतो. व साल्हेर वाडी गावातून प्रवेश केल्यावर येऊन जाऊन 7 तासात पुर्ण करू शकतो.
साल्हेर गावातून सुरुवात करावी सोपे पडेल.
संदर्भ
हे सुद्धा पहा
- भारतातील किल्ले