सार्वजनिक उपलब्ध (विधी आणि न्यायव्यवहार)
सार्वजनिक, सार्वजनिक दृश्यमान (विधी आणि न्यायव्यवहार), सार्वजनिक दृश्यमान, किंवा सार्वजनिक अधिक्षेत्र (विधी आणि न्यायव्यवहार) याच्याशी गल्लत करू नका.
Public Domain हा शब्द विधी आणि न्याय व्यवहारात ज्या एका पेक्षा अधिक अर्थांनी येतो त्यात 'अधिकृतपणे सार्वजनिकरित्या उपलब्ध असणे' या अर्थछटेचा समावेश आहे. कायद्यांच्या दृष्टीकोणातून पाहता, सार्वजनिकरित्या दृष्टीस पडलेली अथवा दृष्टीस पडणारी प्रत्येक गोष्ट सार्वजनिक असेल, सार्वजनिकरीत्या उपलब्ध असेल अथवा सार्वजनिक अधिक्षेत्रात असेल असे नाही. त्याच प्रमाणे सार्वजनिक उपलब्ध गोष्ट सार्वजनिक अधिक्षेत्रात म्हणजे सार्वजनिक मालकीची असेलच असे नाही.