सारागढीची लढाई
१२ सप्टेंबर १८९७ रोजी ब्रिटिश भारतीय लष्कर (शिख सैनिक) आणि पख्तुन ओराकझाई (आदिवासी) यांच्या दरम्यान सारागढीची लढाई लढली गेली. ही लढाई तिराह मोहिमेच्या आधी झाली. ही लढाई उत्तर-पश्चिम फ्रंटियर प्रांतात (आता खैबर पख्तुनखवा, पाकिस्तान) घडली. ब्रिटिश भारतीय सैन्य तुकडीत २१ शिख सैनिक होते. ते ३६ व्या शिखांच्या बटालियनचे (सध्याचे सिख रेजिमेंटचे चौथे बटालियन) सैनिक होते. हे सैन्य तेथे तैनात होते आणि सुमारे १०,००० अफगाणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हवलदार इशर सिंह यांच्या नेतृत्वाखाली शिखांनी हार पत्करण्या पेक्ष्या लढुन मृत्यूस सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. याच कारणास्तव काही लष्करी इतिहासकारांनी या लढाईला इतिहासातील सर्वात महान लढ्याची उपमा दिली आहे. .[१] दोन दिवसांनी दुसऱ्या ब्रिटिश भारतीय सैन्याच्या तुकडीने हा प्रांत परत काबिज केला होता. १२ सप्टेंबर रोजी "सारागढी दिन" म्हणून दरवर्षी या लढाईचे शिख सैनिक सज्ज होतात. [२]
तुकडीतील सैनिक
all २१ शिख कमिशन अधिकारी ज्यांनी सारागढीच्या लढाईत आपले प्राण गमवाले त्यांना मरणोपरांत भारतीय ऑर्डर ऑफ मेरिट बहाल केला. त्या वेळी भारतीय सैनिकांना देण्यात येणारा हा सर्वात मोठा शौर्य पुरस्कार होता. व्हिक्टोरिया क्रॉस हा त्यासंबंधीचा गौरव पुरस्कार होता. हा पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींनीकडुन देण्यात येणाऱ्या आजच्या परम वीर चक्राच्या समतुल्य मानला जातो. बहादुर पुरस्कारांच्या २१ प्राप्तकर्त्यांची नावे अशी आहेत [३][४]
- हवलदार ईशर सिंह (रेजिमेंटल १६५)
- नायक लाल सिंह (३३२)
- लान्स नाईक चंदा सिंह (५४६)
- सिपाही सुंदर सिंह (१३२१)
- सिपाय राम सिंह (२८७)
- सिपाय उत्तर सिंह (४९२)
- सिपाही साहिब सिंह (१८२)
- सिपाय हिरा सिंह (३५९)
- सिपाही दया सिंग (६८७)
- सिपाही जीवन सिंग (७६०)
- सिपाही भोला सिंग (७९१)
- सिपाय नारायण सिंह (८३४)
- सिपाही गुरमुख सिंह (८१४)
- सिपाही जीवन सिंह (८७१)
- सिपाय गुरमुख सिंह (१७३३)
- सिपाय राम सिंह (१६३)
- सिपाही भगवान सिंग (१२५७)
- सिपाही भगवान सिंग (१२६५)
- सिपाही बुटा सिंग (१५५६)
- सिपाही जीवन सिंग (१६५१)
- सिपाही नंद सिंग (१२२१)
संदर्भ
- ^ Pandey, Geeta (5 December 2011). "India polo match honours Sikhs' 1897 Saragarhi battle". British Broadcasting Corporation. bbc.co.uk. 19 July 2012 रोजी पाहिले.
- ^ Singh, Jaisal (13 September 2014). "The 21 Sikhs of Saragarhi" – Business Standard द्वारे.
- ^ "क्र. 26937". द लंडन गॅझेट. 11 February 1898. p. 863.
- ^ Regimental numbers from photo of Saragarhi memorial plaque