तळ्यातला गणपती असलेले सारसबाग हे उद्यान पुण्यातील एक महत्त्वाचे पर्यटन आकर्षण आहे. पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या या बागेतील गणपती पेशव्यांचे पूजास्थान होता.
श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पर्वतीच्या पायथ्याशी सन १७५० साली आंबील ओढयाच्या सीमेवर एक कृत्रिम तलाव तयार करण्याचे काम सुरू झाले. तलावाचे काम सन १७५० ते १७५३ या कालावधीपर्यंत चालले होते. त्या तलावाचे क्षेत्र अंदाजे २५ एकर एवढे विस्तीर्ण होते. या तलावाचा उपयोग नौकाविहारासाठी करण्यात येत होता. तलावात सारस पक्षी सोडले होते. तलावाच्या कामाची खोदाई करीत असताना तलावामध्ये अंदाजे २५००० चौरस फुटाचे बेट तयार करून ते मंदिर व बाग-बगीचा तयार करण्याकरिता राखून ठेवण्यात आले. त्या नंतर बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेला काव्यात्मक ' सारस बाग ' असे नाव ठेवले.
श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सन १७८४ साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली. साहजिकच पर्वती, सारस बाग आणि तलाव ही पुणेकरांची फिरावयास येण्याची व देवदर्शनाची ठिकाणे झाली.
स्वातंत्र्यपूर्व काळात सन १८६१ च्या सुमारास शहरातील अनेक जागा पुणे नगरपालिकेकडे देण्यात आल्या . त्यावेळी गणपती मंदिराचे बेट सोडून तलावाची जागा मुंबई सरकारने पुणे नगरपालिकेकडे हस्तांतरित केली. पुणे नगरपालिकेकडून साधारण सन १९६६ साली तलावाचे जागेत उद्यान विकसित करण्यात आले.
अन्य माहिती
थोरले माधवराव पेशवे यांनी हैदरअल्लीच्या स्वारीवर जाताना दृष्टान्त झाल्यावरून या तळ्यात गणपतीची स्थापना केली, असे म्हणतात (?). गणपतीची मूर्ती संगमरवरी व उजव्या सोंडेची असून भोवताली भव्य सभामंडप व प्रदक्षिणा मार्ग आहे.
राजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय · महात्मा फुले वस्तु संग्रहालय · बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय · पुणे आदिवासी वस्तु संग्रहालय · राष्ट्रीय युद्धवस्तु संग्रहालय
उद्याने आणि प्राणी संग्रहालये
बंड गार्डन · राजीव गांधी उद्यान · शामाप्रसाद मुखर्जी उद्यान · शाहू उद्यान · पेशवे पार्क · सारस बाग · एम्प्रेस गार्डन · कमला नेहरू पार्क ·संभाजी पार्क· थोरात पार्क · ताथवडे उद्यान · नाना-नानी पार्क · पु.ल. देशपांडे उद्यान
दवाखाने
आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे ·अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म पुणे· औंध चेस्ट हॉस्पिटल, पुणे · बोरा हॉस्पिटल, पुणे · चितळे ई एन टी हॉस्पिटल, पुणे · डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे · दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे · देवधर आय हॉस्पिटल, पुणे · गोडबोले हॉस्पिटल, पुणे · गुप्ते हॉस्पिटल, पुणे · हर्डीकर हॉस्पिटल, पुणे · इन्लॅक अँड बुधरानी हॉस्पिटल, पुणे · जालन्स हेंल्थ केअर अँड डायबेटिस केअर सेंटर, पुणे · जहांगीर हॉस्पिटल, पुणे · जोग हॉस्पिटल, पुणे · जोशी क्लिनिक, पुणे · के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे · कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे · कर्णे हॉस्पिटल, पुणे · केअरिंग हॉस्पिटल, पुणे · कृष्णा हॉस्पिटल, पुणे · लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे · मेडिपॉइंट हॉस्पिटल, पुणे · नायडू हॉस्पिटल, पुणे · नाईक हॉस्पिटल, पुणे · एन् एम् वाडिया हॉस्पिटल, पुणे · नोबेल हॉस्पिटल, पुणे · पूना हॉस्पिटल, पुणे · रत्ना मेमोरियल हॉस्पिटल, पुणे ·रुबी हॉल क्लिनिक, पुणे· सह्याद्री हॉस्पिटल, पुणे · साईस्नेह हॉस्पिटल, पुणे · समर्थ हॉस्पिटल, पुणे · संचेती हॉस्पिटल, पुणे · संजीवन हॉस्पिटल, पुणे · ससून जनरल हॉस्पिटल, पुणे · श्री हॉस्पिटल, पुणे · सुरज हॉस्पिटल, पुणे · सूर्या हॉस्पिटल, पुणे ·सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे