सारथी (तारकासमूह)
तारकासमूह | |
सारथी मधील ताऱ्यांची नावे | |
लघुरुप | Aur[१] |
---|---|
प्रतीक | सारथी |
विषुवांश | ०४h ३७m ५४.४२९३s– ०७h ३०m ५६.१८९९s[२] |
क्रांती | ५६.१६४८३३१°– २७.८९१३११६°[२] |
क्षेत्रफळ | ६५७[३] चौ. अंश. (२१वा) |
मुख्य तारे | ५, ८ |
बायर/फ्लॅमस्टीड तारे | ६५ |
ग्रह असणारे तारे | ७ |
३.००m पेक्षा तेजस्वी तारे | ४ |
१०.०० pc (३२.६२ ly) च्या आतील तारे | २ |
सर्वात तेजस्वी तारा | कॅपेला (α Aur) (०.०८m) |
सर्वात जवळील तारा | QY Aur[४] (२०.७४ ly, ६.३६ pc) |
मेसिए वस्तू | ३[५] |
उल्का वर्षाव |
|
शेजारील तारकासमूह | |
+९०° आणि −४०° या अक्षांशामध्ये दिसतो. फेब्रुवारीच्या शेवटी आणि मार्चच्या सुरुवातीला महिन्यात रात्री ९:०० वाजता सर्वोत्तम दिसतो. |
सारथी हा आधुनिक ८८ तारकासमूहातील एक तारकासमूह आहे. दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांच्या ४८ तारकासमूहांच्या यादीत याचा समावेश होता. हा तारकासमूह खगोलीय विषुववृत्तच्या उत्तरेला आहे त्यामुळे तो ३४° दक्षिणपर्यंतच पूर्णपणे दिसू शकतो. त्याला इंग्रजीमध्ये Auriga (ऑरिगा) म्हणतात. हा मूळ लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ "सारथी" असा आहे. सारथी उत्तर खगोलार्धामध्ये हिवाळ्यात संध्याकाळी सर्वात चांगला दिसतो. ६५७ चौ.अंशाचा हा तारकासमूह वासुकी या सर्वात मोठ्या तारकासमूहाच्या अर्ध्या आकाराचा आहे.
वैशिष्ट्ये
तारे
अल्फा ऑरिगे (कॅपेला), सारथीमधील सर्वात तेजस्वी तारा, ४३ प्रकाश-वर्ष अंतरावर आहे.[७] हा आकाशातील सहावा सर्वात तेजस्वी तारा असून त्याची आभासी दृश्यप्रत ०.०८ आहे.[८] याला भारतीय पुराणकथांमध्ये ब्रह्महृदय असे नाव दिले गेले आहे. अरबीमध्ये याला अल्-'अयुक, म्हणजे "शेळी" म्हणले जाई.[९] ब्रह्महृदय हा एक द्वैती तारा आहे ज्याचा आवर्तीकाळ १०४ वर्षे आहे. याचे दोन्ही घटक पिवळे राक्षसी तारे आहेत.
बीटा ऑरिगे (मेन्कालिनन, मेन्कार्लिना)[१०] हा पृथ्वीपासून ८१ प्रकाश-वर्षे अंतरावरील तेजस्वी तारा आहे.[८] याच्या अरबी नावाचा अर्थ "सारथ्याचा खांदा" असा होतो आणि याचा संबंध त्याच्या तारकासमूहातील स्थानाशी आहे.[९] बीटा ऑरिगेची दृश्यप्रत १.९ आहे. हादेखील एक द्वैती तारा आहे.[१०]
आयोटा ऑरिगे हा पृथ्वीपासून ४९४ प्रकाशवर्षे अंतरावरील २.६९ दृश्यप्रतीचा तारा आहे. त्याला अरबी भाषेत कब्धिलिनन असेही म्हणतात[११] याचे वर्गीकरण तेजस्वी तारा असे केले जाते, पण आकाशगंगेतील वायूंचे ढग काही प्रकाश शोषून घेतात त्यामुळे हा तारा थोडा कमी तेजस्वी दिसतो. आयोटा ऑरिगेचा अंत अतिनवताऱ्याने होऊ शकतो, कारण याचे वस्तुमान तश्याप्रकारच्या ताऱ्यांच्या वस्तुमानाच्या मर्यादेजवळ जाणारे आहे.[१२]
डेल्टा ऑरिगे हा सारथीमधील सर्वात उत्तरेकडील तारा पृथ्वीपासून १२६ प्रकाश-वर्ष अंतरावर आहे आणि सुमारे १.३ अब्ज वर्ष जुना आहे.[१३] त्याची आभासी दृश्यप्रत ३.७२, निरपेक्ष दृश्यप्रत ०.२ आणि तेजस्विता ६० L☉ आहे.[१४] सूर्याच्या १२ पट त्रिज्येच्या या ताऱ्याचे वस्तुमान फक्त दोन सौर वस्तुमान आहे.[१३]
यांव्यतिरिक्त अनेक प्रकारचे चलतारे, द्वैती तारे सारथीमध्ये आहेत.
तारा | स्पेक्ट्रल वर्ग | आभासी दृश्यप्रत[१४] | निरपेक्ष दृश्यप्रत[१४] | अंतर (प्रकाश-वर्ष) |
---|---|---|---|---|
टाऊ ऑरिगे | G8III[१५] | ४.५२ | ०.३ | २०६[१५] |
अप्सिलॉन ऑरिगे | M0III[१६] | ४.७४ | −०.५ | ५२६[१६] |
पाय ऑरिगे | M3II[१७] | ४.२६ | −२.४ | ७५८[१७] |
कॅपा ऑरिगे | G8.5IIIb[१८] | ४.२५ | ०.३ | १७७[१८] |
ओमेगा ऑरिगे | A1V[१९] | ४.९४ | ०.६ | १७१[१९] |
२ ऑरिगे | K3III[२०] | ४.७८ | −०.२ | ६०४[२०] |
९ ऑरिगे | F0V[२१] | ५.०० | २.६ | ८६[२१] |
म्यू ऑरिगे | A4m[२२] | ४.८६ | १.८ | १५३[२२] |
सिग्मा ऑरिगे | K4III[२३] | ४.८९ | −०.३ | ४६६[२३] |
काय ऑरिगे | B4Ib[२४] | ४.७६ | −६.३ | ३०३२[१४] |
शी ऑरिगे | A2V[२५] | ४.९९ | ०.८ | २३३[२५] |
ग्रहमाला असणारे तारे
सारथीमधील अनेक ताऱ्यांभोवती ग्रहमाला आहेत. एचडी ४०९७९ ला एक ग्रह आहे, एचडी ४०९७९ बी. एचडी ४०९७९ पृथ्वीपासून ३३.३ पार्सेक अंतरावर आहे. त्याची दृश्यप्रत ६.७४ आहे आणि आकार सुमारे सूर्याएवढा आहे. ग्रहाचे वस्तुमान गुरू ग्रहाच्या ३.८३ पट आहे आणि तो ताऱ्याभोवती ०.८३ AU अंतरावरून २६३.१ दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो.[२६] एचडी ४५३५० या ताऱ्याभोवती एक ग्रह आहे. एचडी ४५३५० बी चे वस्तुमान १.७९ गुरू वस्तुमान आहे आणि तो त्याच्या ताऱ्याभोवती १.९२ AU अंतरावरून ८९०.७६ दिवसांमध्ये प्रदक्षिणा पूर्ण करतो. तो पृथ्वीपासून ४९ पार्सेक अंतरावर आहे. याशिवाय एचडी ४३६९१ या ताऱ्याभोवतीदेखील २.४९ गरू वस्तुमानाचा ग्रह आढळला आहे.
याशिवाय एचडी ४९६७ए, एचडी ४२१७ए या ताऱ्यांभोवती ग्रह सापडले आहेत.
दूर अंतराळातील वस्तू
खगोलावरील दीर्घिकीय केंद्राचा विरुद्ध बिंदू बीटा ऑरिगेपासून ३.५° अंतरावर आहे. आकाशगंगा त्याच्यामधून जात असल्याने सारथीमध्ये अनेक खुले तारकागुच्छ आहेत. एम३६, एम३७ आणि एम३८ हे तीनही सारथीमधील सर्वात मोठे खुले तारकागुच्छ आहेत, जे लहान दुर्बिणीतून किंवा द्विनेत्रीतून दिसतात.
एम३६ (एनजीसी १९६०) एक तरुण खुला तारकागुच्छ आहे ज्यामध्ये सुमारे ६० तुलनेने प्रखर तारे आहेत. तो पृथ्वीपासून ३,९०० प्रकाश-वर्ष अंतरावर आहे आणि त्याची सरासरी दृश्यप्रत ६.० आहे. त्याची रुंदी १४ प्रकाश-वर्ष आहे. यातील बहुतांश तारे बी-प्रकारचे मुख्य अनुक्रम तारे आहेत.
एम३७ (एनजीसी २०९९) हा एम३६ पेक्षा थोडा मोठा खुला तारकागुच्छ आहे ज्यामध्ये सुमारे १५० तारे आहेत. तो पृथ्वीपासून ४,२०० प्रकाश-वर्ष अंतरावर आहे आणि त्याची सरासरी दृश्यप्रत ५.६ आहे. त्याचा व्यास सुमारे २५ प्रकाश-वर्ष आहे. यातील तारे एम३६ मधील ताऱ्यांपेक्षा जुने आहेत. यातील बहुतांश तारे ए-प्रकारचे मुख्य अनुक्रम तारे आहेत.
एम३८ हा वरील दोघांपेक्षा थोडा विखुरलेला खुला तारकागुच्छ आहे ज्यामध्ये सुमारे १०० तारे आहेत. तो पृथ्वीपासून ३,९०० प्रकाश-वर्ष अंतरावर आहे आणि त्याची सरासरी दृश्यप्रत ६.४ आहे. त्याचा व्यास सुमारे २५ प्रकाश-वर्ष आहे. यातील तारे एम३६ मधील ताऱ्यांपेक्षा जुने आहेत. वरील तारकागुच्छांविरुद्ध यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तारे आहेत.
उल्का वर्षाव
सारथीमध्ये दोन उल्का वर्षाव आहेत. ऑरिगिड्स त्यांच्या अधूनमधून होणाऱ्या वर्षावांसाठी प्रसिद्ध आहेत, जसे की १९३५, १९८६, १९९४, आणि २००७ मधील वर्षाव.[२७] या उल्कावर्षावांचा स्रोत काएस (सी/१९११ एन१) हा धूमकेतू आहे.
संदर्भ आणि नोंदी
- ^ Russell 1922, पान. 469.
- ^ a b IAU, The Constellations, Auriga.
- ^ Ridpath, Constellations.
- ^ RECONS, The 100 Nearest Star Systems.
- ^ Bakich 1995, पान. 54.
- ^ Bakich 1995, पान. 26.
- ^ SIMBAD Alpha Aurigae.
- ^ a b Moore & Tirion 1997, पान. 130–131.
- ^ a b Davis 1944.
- ^ a b Ridpath & Tirion 2001, पाने. 86–88.
- ^ SIMBAD Iota Aurigae.
- ^ Kaler 2009.
- ^ a b Kaler 2008.
- ^ a b c d Moore 2000, पाने. 338–340, Table 14.12.
- ^ a b SIMBAD Tau Aurigae.
- ^ a b SIMBAD Upsilon Aurigae.
- ^ a b SIMBAD Pi Aurigae.
- ^ a b SIMBAD Kappa Aurigae.
- ^ a b SIMBAD Omega Aurigae.
- ^ a b SIMBAD 2 Aurigae.
- ^ a b SIMBAD 9 Aurigae.
- ^ a b SIMBAD Mu Aurigae.
- ^ a b SIMBAD Sigma Aurigae.
- ^ SIMBAD Chi Aurigae.
- ^ a b SIMBAD Xi Aurigae.
- ^ Exoplanet Encyclopedia HD 40979 b.
- ^ Jenniskens 2006, पाने. 175–178.