Jump to content

सारंगखेडा


सारंगखेडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तापी नदीच्या किनाऱ्यावर असलेले एक गाव आहे.

सारंगखेडा हे तेथे १८व्या शतकापासून दरवर्षी भरणाऱ्या घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. 'शोले' पासून 'बाजीराव-मस्तानी'पर्यंतच्या चित्रपटांसाठी घोडे आणि घोडदळ पुरवणारा आणि अवघ्या पंधरा दिवसांत दहा ते पंधरा कोटींची उलाढाल करणारा खानदेशातील हा घोडेबाजार आहे.हा बाजार संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.

आधी राजस्थानातील पुष्करला, मग पंढरपूरला, तिथून मग सारंगखेड्याला हा बाजार येतो. इथून पुढे हा बाजार हलतो नांदेडच्या माळेगावला आणि तिथून पुन्हा उत्तर महाराष्ट्रातल्या शिरपुरात येतो.

सारंगखेड्याला एकमुखी दत्ताचे एक देऊळ आहे. दत्त जयंतीच्या निमित्ताने येथे यात्रा भरते. यात्रेदरम्यानच हा घोडेबाजार असतो. येथील घोडेबाजाराने पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथील घोड्याच्या व्यापाऱ्यांना चांगलेच आकर्षित केले आहे. याचे कारण या बाजारात पंजाब, मारवाड, काठियावाड, सिंध, गावठी अशा नस्लीचे १५००हून अधिक घोडे विक्रीसाठी येतात, व त्यांना चांगले दाम मिळते याची खात्री असते.. त्यामुळे दरवर्षी उत्तमोत्तम घोडे घेऊन येथील बाजारात व्यापारी हजेरी लावतात. एकेक अस्सल जातिवंत घोडा निरखून, पारखून घेतला जातो. ५० हजारांपासून २१ लाखांपर्यंत घोड्यांच्या किंमती असतात.

सिनेसृष्टीतील कलाकारांपासून ते देशाच्या कोनाकोपऱ्यातून घोडेशौकीन खरेदीसाठी येत आहेत. लग्नकार्यात भाड्यानं देण्यासाठी आणि पर्यटनस्थळी सवारीचा व्यवसाय करण्यासाठी लागणारे घोडे या यात्रेत मोठ्या प्रमाणात आहेत. भव्य प्रासादापुढं बांधण्यासाठी, मनात येईल तेव्हा रपेट मारण्यासाठी घोडे खरेदी करणारे नवश्रीमंत, चित्रपट निर्माते, अभिनेतेही इथं खरेदीसाठी येतात.

रेससाठी वापरल्या जाणाऱ्या घोड्यांची जात वेगळीच असते. असे घोडे या यात्रेत क्वचितच पाहायला मिळतात.

मारवाडी जातीचे घोडे उंच असतात; त्यांची उंची पाच ते पाच ते साडेपाच फूट असते. ते दिसायलाही आकर्षक असतात. त्यांचे कान उंच असून, त्यांची टोके एकमेकांशी जुळतात. काठेवाडी घोडे दिसायला तजेलदार असतात. त्यांचे कान कमी उंच असतात. पण चेहरा पसरट असतो. त्यामुळे ते भारदस्त दिसतात. तर पंजाबी घोडे अधिकतर शुभ्र आणि तेजस्वी असतात. त्यांच्या पांढऱ्या वर्णावर किंचित डाग आढळतो. ते शुभ्रवर्णी पंजाबी घोडे 'नुकरा' नावाने प्रसिद्ध आहेत. अश्वशौकिनांची या घोड्यांना विशेष मागणी असते.

काही जण फक्त छंद म्हणून घोडे बाळगतात, तर काहींना घोडागाडीसारख्या व्यवसायासाठी तो हवा असतो. त्यामुळे प्रत्येक खरेदीदार घोड्यांची पारख करताना आपली गरज पाहतो. काठेवाडी घोडे नाच शिकण्यासाठी उत्तम असल्याने लग्नात नाचण्यासाठी याच घोड्यांना मागणी असते. पंजाबी शुभ्र घोडे लग्नात मिरवणुकीसाठी वापरले जातात. मिरवणुकीतील रथांना ते जुंपतात. शौकीन मंडळीही शुभ्र घोडे पसंत करतात. गरजेनुसार देवमान, कंठळ, जयमंगल, पद्म, शामकर्ण, पंचकल्याणी या सगळ्याच घोड्यांना बाजारात मागणी असली, तरी व्यवसायासाठी घोडा खरेदी करणारा त्याला आवडलेल्या घोड्यात फार खोड्या काढत नाही. परंतु तोच जर एखद्या शौकीनास खरेदी करावयाचा असेल, तर तो त्या घोड्यांची सविस्तर अंगपरीक्षा घेतो. घोड्याच्या अंगावरील सर्व खुणा तपासतो. घोडेबाजार हा बघण्यासाठी सर्वांना खुला असतो लहान मुले तरुण प्रौढ आणि वृद्ध सर्वांना घोडेबाजाराचा आकर्षण असते घोडेबाजार आणि बैलबाजार हा केव्हा प्राण्यांचा बाजार नसून खऱ्या अर्थाने पशुसंवर्धन आहे पशु प्रेमापोटी परिसरातील आणि संपूर्ण विश्वातील पशू प्रेमी येथे एकत्र येत असतात महाराष्ट्र सरकारने पर्यटन पर्यटन माध्यमातून प्रगती केलेली आहे [【बैलगाडी बाजार】] सारंगखेडा हे तेथे १८व्या शतकापासून दरवर्षी भरणाऱ्या घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. 'शोले' पासून 'बाजीराव-मस्तानी'पर्यंतच्या चित्रपटांसाठी घोडे आणि घोडदळ पुरवणारा आणि अवघ्या पंधरा दिवसांत दहा ते पंधरा कोटींची उलाढाल करणारा खानदेशातील हा घोडेबाजार आहे.हा बाजार संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.

आधी राजस्थानातील पुष्करला, मग पंढरपूरला, तिथून मग सारंगखेड्याला हा बाजार येतो. इथून पुढे हा बाजार हलतो नांदेडच्या माळेगावला आणि तिथून पुन्हा उत्तर महाराष्ट्रातल्या शिरपुरात येतो.

सारंगखेड्याला एकमुखी दत्ताचे एक देऊळ आहे. दत्त जयंतीच्या निमित्ताने येथे यात्रा भरते. यात्रेदरम्यानच हा घोडेबाजार असतो. येथील घोडेबाजाराने पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथील घोड्याच्या व्यापाऱ्यांना चांगलेच आकर्षित केले आहे. याचे कारण या बाजारात पंजाब, मारवाड, काठियावाड, सिंध, गावठी अशा नस्लीचे १५००हून अधिक घोडे विक्रीसाठी येतात, व त्यांना चांगले दाम मिळते याची खात्री असते.. त्यामुळे दरवर्षी उत्तमोत्तम घोडे घेऊन येथील बाजारात व्यापारी हजेरी लावतात. एकेक अस्सल जातिवंत घोडा निरखून, पारखून घेतला जातो. ५० हजारांपासून २१ लाखांपर्यंत घोड्यांच्या किंमती असतात.

सिनेसृष्टीतील कलाकारांपासून ते देशाच्या कोनाकोपऱ्यातून घोडेशौकीन खरेदीसाठी येत आहेत. लग्नकार्यात भाड्यानं देण्यासाठी आणि पर्यटनस्थळी सवारीचा व्यवसाय करण्यासाठी लागणारे घोडे या यात्रेत मोठ्या प्रमाणात आहेत. भव्य प्रासादापुढं बांधण्यासाठी, मनात येईल तेव्हा रपेट मारण्यासाठी घोडे खरेदी करणारे नवश्रीमंत, चित्रपट निर्माते, अभिनेतेही इथं खरेदीसाठी येतात.

रेससाठी वापरल्या जाणाऱ्या घोड्यांची जात वेगळीच असते. असे घोडे या यात्रेत क्वचितच पाहायला मिळतात.

मारवाडी जातीचे घोडे उंच असतात; त्यांची उंची पाच ते पाच ते साडेपाच फूट असते. ते दिसायलाही आकर्षक असतात. त्यांचे कान उंच असून, त्यांची टोके एकमेकांशी जुळतात. काठेवाडी घोडे दिसायला तजेलदार असतात. त्यांचे कान कमी उंच असतात. पण चेहरा पसरट असतो. त्यामुळे ते भारदस्त दिसतात. तर पंजाबी घोडे अधिकतर शुभ्र आणि तेजस्वी असतात. त्यांच्या पांढऱ्या वर्णावर किंचित डाग आढळतो. ते शुभ्रवर्णी पंजाबी घोडे 'नुकरा' नावाने प्रसिद्ध आहेत. अश्वशौकिनांची या घोड्यांना विशेष मागणी असते.

काही जण फक्त छंद म्हणून घोडे बाळगतात, तर काहींना घोडागाडीसारख्या व्यवसायासाठी तो हवा असतो. त्यामुळे प्रत्येक खरेदीदार घोड्यांची पारख करताना आपली गरज पाहतो. काठेवाडी घोडे नाच शिकण्यासाठी उत्तम असल्याने लग्नात नाचण्यासाठी याच घोड्यांना मागणी असते. पंजाबी शुभ्र घोडे लग्नात मिरवणुकीसाठी वापरले जातात. मिरवणुकीतील रथांना ते जुंपतात. शौकीन मंडळीही शुभ्र घोडे पसंत करतात. गरजेनुसार देवमान, कंठळ, जयमंगल, पद्म, शामकर्ण, पंचकल्याणी या सगळ्याच घोड्यांना बाजारात मागणी असली, तरी व्यवसायासाठी घोडा खरेदी करणारा त्याला आवडलेल्या घोड्यात फार खोड्या काढत नाही. परंतु तोच जर एखद्या शौकीनास खरेदी करावयाचा असेल, तर तो त्या घोड्यांची सविस्तर अंगपरीक्षा घेतो. घोड्याच्या अंगावरील सर्व खुणा तपासतो. घोडेबाजार हा बघण्यासाठी सर्वांना खुला असतो लहान मुले तरुण प्रौढ आणि वृद्ध सर्वांना घोडेबाजाराचा आकर्षण असते घोडेबाजार आणि बैलबाजार हा केव्हा प्राण्यांचा बाजार नसून खऱ्या अर्थाने पशुसंवर्धन आहे पशु प्रेमापोटी परिसरातील आणि संपूर्ण विश्वातील पशू प्रेमी येथे एकत्र येत असतात महाराष्ट्र सरकारने पर्यटन पर्यटन माध्यमातून प्रगती केलेली आहे

घोड्याच्या खोड्या संपादन करा घोड्यात ७२ खोड्या म्हणजे दोष काढता येतात. अंगावरील खोड्या कुठे आणि कशा आहेत ते महत्त्वाचे असते. या खुणा मुख्यत्वे भोवऱ्याच्या स्वरूपात असतात. गळ्यावर भोवरा असलेला घोडा उत्तम समजला जातो. त्या घोड्यास 'देवमान' म्हणले जाते. घोड्याच्या छातीवर दोघींकडे आणि डोक्यावर दोन भोवरे असलेला घोडा शुभलक्षणी मानला जातो. पोटावर भोवरा असेल, तर तेही शुभ मानून त्यास गंगापाट म्हणले जाते. मात्र, त्याचवेळी डोक्यावर, गळ्यावर तीन आणि चार भोवरे असतील, तर ते अशुभ मानले जाते. मागच्या पायात ढोपराच्या सांध्याजवळ खालच्या दिशेने खोल खड्डा असेल, तर तो घोडा चांगला समजला जातो, असा घोडा मालकाच्या ताब्यात राहतो. वरच्या दिशेने खड्डा असलेला घोडा खुटी उपटून पळणारा मानला जातो. निव्वळ छंद म्हणून दारातील शुभलक्षण म्हणून घोडा पाळणारे घोड्यातील अशी सारी लक्षणे तपासून खरेदी करतात. अशा शुभलक्षणी घोड्याचा दाम लाखावर असतो. पंचकल्याणी घोडा खास करून देवाचे वाहन म्हणून वापरला जातो. त्याचे चारही ढोपराखाली शुभ्र असतात, डोळे घारे असतात. या दोन डोळ्यांना 'जयमंगल' असे म्हणले जाते.

व्यवस्थापन संपादन करा या घोडेबाजाराचे संपूर्ण व्यवस्थापन शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून केले जाते. वेगवेगळ्या राज्यातील व्यापारी येथील पटांगणात भव्य शामियाना ठोकतात. घोड्यावरून रपेट करण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात आलेली असते. असतो. घोड्यांना दुखापत झाल्यास उपचारासाठी पशुसंवर्धन विभाग कार्यरत असतो.

यात्रा संपादन करा दत्त जयंतीला सारंगखेड्याला यात्रा भरते. येथे अन्य यात्रांप्रमाणेच गुळाची जिलेबी, गोडीशेव, शेवखमणी आणि आळूपात्रा यांची दुकाने असतात. सातपुड्यातील आदिवासी महिला चुलींवर भाजलेल्या ज्वारी, बाजरी, नागली व मक्याच्या भाकऱ्या बनवून गिऱ्हाइकांना विकतात. याशिवाय तमाशाचे तंबू, नमकीन चाटचे ठेले, पेढ्यांची दुकाने, चूर्णाची जडी-बुटी विकणारे या सर्व गोष्टी याही यात्रेत असतात.

चर्चा शेवटचा बदल इतक्यातच Kailaschavhan संबंधित लेख पेशव्यांचे मराठी सैन्यदल भारतातील रोखे बाजार भारत देशामधील रोखे बाजार

संघचारी टिटवी विकिपीडिया इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. गुप्तताडेस्कटॉप बंद बैलगाडी बाजार सारंखेडा यात्रेचे आकर्षण बैलगाडी बाजार हे कधी कोणी काळी राहिलेले आहे आज बैलगाडी इतिहासजमा झालेली असली तरीसुद्धा सारंखेडा येथे परिसरातील सुतार समाजाचे लोक बैलगाडी बनवून कास्तकार याचा महत्त्वाचा अभियंता म्हणून भूमिका बजावत असत भगवान विश्वकर्मा यांच्या कृपाशीर्वादाने विविध प्रकारची कृषी कृषी यंत्र कोणत्याही काळात टिकतील अशी आणि जवळच्या जंगलात उपलब्ध असलेल्या किंवा शेतावरच्या बांधावर तोडलेल्या लाकडापासून निर्माण केलेली असल्यामुळे अर्थव्यवस्थेवर कोणत्याही प्रकारचा भार निर्माण करीत नसत इतिहासजमा झालेली ही प्रथा आणि अर्थशास्त्र अतिशय महत्त्वाची कृती आज अभ्यासणे गरजेचे आहे जीवन विज्ञानामध्ये कृषी अर्थशास्त्राचे महत्त्व असून जीवन विज्ञानाला अत्यावश्यक असे शाश्वत विकासाची यंत्र बनवणे गरजेचे आहे श्री विश्वकर्मा गुजराती सुतार समाज विकास मंडळ शिरपूर येथील संस्थेचे सदस्य असलेले समाज बांधव बैलगाडी बनवत असतात अगोदरच्या काळामध्ये ही संस्था श्री विश्वकर्मा गुजराती सुतार पंचमंडळ संगम मुडावद तापी व पांझरा दोन नद्यांच्या संगमावर ती एकत्र येत असत आज ती परंपरा कायम ठेवून मुंबई-आग्रा महामार्ग आणि अंकलेश्वर बराणपुर आंतरराज्य मार्ग यांच्या संगमावर ती शिरपूर येथे सर्व सदस्य एकत्र येतात परंतु आजच्या काळात लाकूड या वस्तूचे रूपांतरण ॲल्युमिनियम लोखंड व काँक्रीट या वस्तूंनी घेतल्यामुळे आपोआपच कारागिरांना आपल्या व्यवसायाचे रूपांतर करावे लागले असून उड कास्ट प्रोडक्शन हे मेटल कास्ट प्रॉडक्शनमध्ये कन्व्हर्शन झाले आहे Kailaschavhan

घोड्याच्या खोड्या

घोड्यात ७२ खोड्या म्हणजे दोष काढता येतात. अंगावरील खोड्या कुठे आणि कशा आहेत ते महत्त्वाचे असते. या खुणा मुख्यत्वे भोवऱ्याच्या स्वरूपात असतात. गळ्यावर भोवरा असलेला घोडा उत्तम समजला जातो. त्या घोड्यास 'देवमान' म्हणले जाते. घोड्याच्या छातीवर दोघींकडे आणि डोक्यावर दोन भोवरे असलेला घोडा शुभलक्षणी मानला जातो. पोटावर भोवरा असेल, तर तेही शुभ मानून त्यास गंगापाट म्हणले जाते. मात्र, त्याचवेळी डोक्यावर, गळ्यावर तीन आणि चार भोवरे असतील, तर ते अशुभ मानले जाते. मागच्या पायात ढोपराच्या सांध्याजवळ खालच्या दिशेने खोल खड्डा असेल, तर तो घोडा चांगला समजला जातो, असा घोडा मालकाच्या ताब्यात राहतो. वरच्या दिशेने खड्डा असलेला घोडा खुटी उपटून पळणारा मानला जातो. निव्वळ छंद म्हणून दारातील शुभलक्षण म्हणून घोडा पाळणारे घोड्यातील अशी सारी लक्षणे तपासून खरेदी करतात. अशा शुभलक्षणी घोड्याचा दाम लाखावर असतो. पंचकल्याणी घोडा खास करून देवाचे वाहन म्हणून वापरला जातो. त्याचे चारही ढोपराखाली शुभ्र असतात, डोळे घारे असतात. या दोन डोळ्यांना 'जयमंगल' असे म्हणले जाते.

व्यवस्थापन

या घोडेबाजाराचे संपूर्ण व्यवस्थापन शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून केले जाते. वेगवेगळ्या राज्यातील व्यापारी येथील पटांगणात भव्य शामियाना ठोकतात. घोड्यावरून रपेट करण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात आलेली असते. असतो. घोड्यांना दुखापत झाल्यास उपचारासाठी पशुसंवर्धन विभाग कार्यरत असतो.

यात्रा

दत्त जयंतीला सारंगखेड्याला यात्रा भरते. येथे अन्य यात्रांप्रमाणेच गुळाची जिलेबी, गोडीशेव, शेवखमणी आणि आळूपात्रा यांची दुकाने असतात. सातपुड्यातील आदिवासी महिला चुलींवर भाजलेल्या ज्वारी, बाजरी, नागली व मक्याच्या भाकऱ्या बनवून गिऱ्हाइकांना विकतात. याशिवाय तमाशाचे तंबू, नमकीन चाटचे ठेले, पेढ्यांची दुकाने, चूर्णाची जडी-बुटी विकणारे या सर्व गोष्टी याही यात्रेत असतात.