सामाजिक समूह
सामाजिक समूह ही संकल्पना पाहण्यापूर्वी समूह या संकल्पनेचा अर्थ जाणून घेणे आवष्यक आहे. समूह म्हणजे एकमेकांच्या सान्निध्यात असणे एकमेकांच्या निकट असणे. उदा. कपाटामध्ये लावून ठेवलेली पुस्तके, बांधकामासाठी रचून ठेवलेल्या विटा, हरणाचे कळप इ. हे सर्व समूह आहेत. हे घटक परस्परांच्या सान्निध्यात जरी असले तरी त्यांच्यात संबंध प्रस्थापित होत नाहीत. त्यांना परस्परांच्या अस्तित्वाची जाणीव नसते. एका बसमध्ये बसलेले सर्व प्रवासी देखील एका प्रकारचा समूह आहे. परंतु जेव्हा त्यांना परस्परांच्या अस्तित्वाची जाणीव होते तेव्हा सामाजिक समूह अस्तित्वात येतो.
इतर प्राण्यांच्या व वस्तूंच्या तुलनेत मानवी समूह अत्यंत महत्त्वाचा मानला जातो याचे प्रमूख कारण म्हणजे मानवामधील परस्पर संबंध प्रस्थापित होत असतात. समान ध्येय प्राप्तीसाठी एकत्रितपणे प्रयत्न केले जातात आणि संबंधाची व्यवस्था टिकून राहवी म्हणून व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवले जाते.त्यामुळे मानवी समूह व्यक्तीच्या अस्तित्वासाठी समाजाच्या सातत्य व स्थैर्यासाठी अत्यंत आवष्यक आहे. या संकल्पनेची व्याख्या आणि स्वरूप पाहणे अत्यंत आवष्यक आहे.
सामाजिक समूहाची व्याख्या आणि वैषिष्टयेः-
परस्परांशी आदान-प्रदान करणाऱ्या कितीही माणसांचा गट म्हणजे समुह होय
_ जे.एफ.क्यूबर
1) जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्रित येऊन परस्परांना प्रभावित करून आपल्या विविध गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा त्याला सामाजिक समूह असे म्हणतात.
2) सामाजिक समूह म्हणजे अषा व्यक्तीच्या समुह आहे कि ज्यांना आपल्या सदस्यात्वांची आणि संबंधांची जाणिव असते.
3) जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती ज्या बÚयाच कालावधी करता परस्परांषी संबंधीत असतात व समान ध्येय प्राप्तीसाठी एकत्रितपणे कार्य करतात त्याला सामाजिक समूह असे म्हणतात.
वरील व्याख्येवरून सामाजिक समूहाची काही ठळक वैषिष्टये निदर्षनास येतात. या वैषिष्टयानुसार समूहाचे स्वरूप निदर्षनास येवू शकते.
1) किमान दोन व्यक्तींची आवष्यकताः
सामाजिक समूहाची निर्मिती किमान दोन व्यक्तींवर अवलंबून असते जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती बÚयाच कालावधीकरिता परस्परांषी संबंधित असतात. परस्परांच्या अस्तित्वाची जाणीव असते. तेव्हाच सामाजिक समूह निर्माण होतो. एकटा व्यक्ती सामाजिक समूह निर्माण करू शकत नाही. काही वेळा एखादया सभेला उपस्थित असणारी व्यक्ती त्यांच्यात परस्पर संबंध नसले तर त्यांना सामाजिक समूह म्हणता येणार नाही. समूहासाठी किमान दोन व्यक्तींची आवष्यकता आणि दीर्घ कालावधीचे परस्पर संबंध असले पाहिजेत.
2) समान ध्येयः
सामाजिक समूहामध्ये कुटुंब, मित्र, परिवार, राजकीय पक्ष, कामातील सहकारी इ.चा समावेष झालेला आढळतो या सर्व समूहामध्ये समान ध्येय साध्य केली जातात.
उदा. एखादया राजकीय पक्षातील सर्व सदस्य निवडणूक जिंकून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये वेगवेगळया मार्गाचा अवलंब होवू शकतो.
उदा. कुटुंबाचा विकास व्हावा समृद्धी व्हावी सर्व सदस्य आनंदी व सुखी रहावे म्हणून सर्व सदस्य आपआपलया परिने प्रयत्न करून समान ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करतात.
3) मानसिक एकात्मताः
सामाजिक समूहातील सदस्यांमध्ये मानसिक दृष्टया एकात्मता आढळते. त्यांच्यात आपलेपणाची भावना दिसून येते. समूहाचा समृद्धीमध्येच आपली समृद्धी आहे. समूहाच्या विकासामध्ये आपला विकास आहे. अषा प्रकारची भावना प्रत्येक सदस्यांची असते.
उदा. कुटुंबामध्ये सर्व सदस्य आपआपल्या परिने प्रयत्न करून कुटुंबाचा विकास करण्याचा प्रयत्न करतात. कारण कुटूंबाच्या विकासातूनच आपला विकास होऊ शकतो. एखादाय सदस्याला आनंद होईल म्हणून इतर सदस्य वैयक्तिक त्याग देखील करतात अषा प्रकारची भावना सामाजिक समूहामध्ये आढळते.
4) सहकार्य व परावलंबनः
समूहाच्या सदस्यांध्ये सहकार्याची भावना दिसून येे सर्व सदस्य एकाच प्रकारची कामे करून अथवा वेगवेगळया प्रकारची कामे करून समान ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना दिसून येते स्वतःपेक्षा समूहाला विषेष महत्त्व दिल्यामुळे ते परस्परांवर अवलंबून असतात कोणत्याही प्रसंगात ते एकत्रित असतात समूहाचा सुखात किंवा दुःखात ते मानसिक आधारासाठी इतर सदस्यांवर अवलंबून असतात. सदस्य परस्परांना प्रेरित करतात आपष्यक ती मदत करतात काही कारणांमुळे अपयष आल्यास ते परस्परांवर अवलंबून असतात.
समूहाचे महत्त्वः
सामाजिक समूह हे व्यक्तीसाठी समूहासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते व्यक्तीचे अस्तित्व, समाजाची निर्मिती, आणि सातत्य हे समूहावर अवलंबून असते. व्यक्तीचा जन्म कुटुंब या समूहामध्ये होतो. जैविक अस्तित्वाची जाणीव कुटुंबामध्येच होते. बाल्यावस्थेत संगोपन, संवर्धन आणि समाजिकरणाची प्रक्रिया समूहामध्येच होते. व्यक्ती जे विविध गुण आत्मसात करते. ते देखील समूहामध्येच होऊ शकते. याषिवाय अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा आणि मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक इत्यादी गरजा देखील समूहामध्येच पूर्ण होऊ शकतात. मनुष्य एक सामाजिक प्राणी आहे. त्याचे अस्तित्व समूहामध्येच टिकू शकते. जे विविध गुण तो आत्मसात करतो व इतर कौषल्यांचा विकास करतो. हे देखील समूहामध्ये शक्य आहे. रविंद्रनाथ टागोर सारखे साहित्यिक अािवा सुनिल गावस्कर सारखे खेळाडू यांचा विकास समूहामुळेच झालेला आहे. अषा प्रकारे व्यक्तीच्या विकासासाठी सामाजिक समूह अत्यंत आवष्यक आहे. याषिवाय मित्रांच्या समूहामध्ये व्यक्ती मनमोकळेपणाने बोलून आपल्याला पडलेल्या प्रष्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो. अनुभवांची देवाणघेवाण होते. इतर व्यक्तींच्या बाबतीत अधिक माहिती मिळते. अषाप्रकारे व्यक्तींच्या मानसिक विकास घडून येतो.
व्यक्ती समूहात राहत असल्यामुळेच तो स्वतःची इतरांबरोबर तुलना करू शकतो या तुलनेतूनच आपल्याला विकास करण्याची प्रेरणा मिळते. कार्यक्षमतेत वाढ होते. आणि यामुळेच समूह व्यक्तींच्या कार्यक्षमतेत वाढ करून इतर कौषल्य प्राप्त करून व्यावसायिक विकास साधणयस मदत करते.
लहान-मोठे समूह एकत्रित मिळूनच समाजाची निर्मिती होते. समाजाचे स्वास्थ्य आणि स्थैर्य या समूहांवर अवलंबून असते. मित्र परिवार, कुटूंब, नातेवाईक कामातील सहकारी इत्यादी लहान समूहांपासून राजकीय पक्ष एखादया धर्माचे सदस्य इत्यादीसारखे मोठे समूह परस्परांषी संबंधित असतात कोणत्याही एका समूहात अडथळे अथवा विघ्न निर्माण झाले तर त्याच परिणाम संपूर्ण समाजव्यवस्थेवर होत असतो. त्यामुळे समूह समाजाच्या सातत्यासाठी आणि स्थैर्यासाठी अत्यंत आवष्यक आहे.
सामाजिक समूहांचे वर्गीकरणः-
समाजषास्त्रज्ञांनी सामाजिक समूहांचे वर्गीकरण करताना वेगवेगळया तत्त्वाचा आधार घेतलेला आहे. त्या तत्त्वांच्या आधारे समूहांचे अनेक प्रकार करता येतात.
1) आकारः
समूहाच्या आकारातून त्याचे दोन प्रकार करता येतात. जया समूहामध्ये सदस्यांची संख्या कमी आहे अषा समहाला लहान समूह असे म्हणतात.
उदा. कुटुंब, मित्र, नातेवाईक, इत्यादी.
ज्या समूहामध्ये सदस्यांची संख्या जास्त आहे.
उदा. राजकीय, पक्ष, जात, धर्म, इत्यादी यांना मोठा समूह असे म्हणतात.
2) व्यक्तीगत इच्छाः
व्यक्तीच्या इच्छेवरून समूहाचे प्रकार करता येातत. व्यक्ती ज्या समूहांचा सदस्य जन्मापासून असतो अथवा ज्याचे सदस्यत्व टाळता येत नाही त्याला अनैच्छिक समूह असे म्हणतात.
उदा. जात, धर्म, कुटुंब, इत्यादी, यांचे सदस्यत्व जन्मानेच रप्राप्त होत असते. याउलट ज्या समूहाचे सदस्यत्व सिव्कारणे अथवा न स्विकारणे व्यक्तीच्या हातामध्ये असते. त्याला एैच्छिक समूह असे म्हणतात.
उदा. राजकीय पक्ष, मित्र, नोकरीचे ठिकाण.
3) कालमर्यादाः
जे समूह अल्प कालावधीकरिता निर्माण झालेले असतात व आपला हेतू साध्य झाल्यानंतर ते विसर्जित होतात त्यांना अस्थायी समूह असे म्हणतात.
उदा. गणेषमंडळ अथवा नवरात्र मंडळातील सदस्या याउलट जे समूह स्थिर स्वरूपाचे असतात. ज्यातील सदस्य बदलतात परंतु समूह टिकून राहतो अषा समूहाला स्थायी समूह असे म्हणतात.
उदाः राज्यसभेतील सदस्यांचा समूह होय.
4) हितसंबंधः
काही व्यक्ती विषेष ध्येय साध्य करण्यासाठी एकत्र आलेले असतात.
उदा. सैन्यामधील काही अधिकारी विषेष कामगिरी बजावण्यासाठी एकत्र येतात. त्यांच्या समूहाला विषिष्ट हितसंबंध समूह असे म्हणतात. याउलट काही व्यक्ती दैनंदिन जीवनातील जबाबदारी म्हणून एकत्र आलेले असतात.
उदा. बँकेतील कर्मचाÚयांचे समूह अथवा मित्रपरिवार याला सामान्य हितंसंबंध समूह असे म्हणतात.
5) सदस्यत्वः
व्यक्ती आपल्या जिवनामध्ये ज्या-ज्या समूहांचा सदस्य असतो ते समूह त्याच्यासाठी अंतरसमूह म्हणून ओळखले जातात.
उदा. एखादा षिक्षक हा त्याच्या कुटूंबाचा, त्याचा मित्रांचा अथवा षिक्षक संघटनेचा सदस्य असू शकतो परंतु व्यापारांच्य संघटनेचा तोच सदस्य नसतो. यावरून व्यक्ती ज्या समूहांचा सदस्य नाही ते समूह त्याच्यासाठी बर्हिसमूह म्हणून ओळखले जातात.
6) संबंधाचे स्वरूपः
व्यक्तींमधील संबंध हे कोणत्या प्रकारचे आहेत. यावरून समूह निष्चित केले जातात. व्यक्तींमधील संबंध समोरासमोरचे जवळचे आत्मियतेचे असले तर अषा संबंधंाना प्राथमिक संबंध असे म्हणतात. प्राथमिक संबंध असणाÚया समूहांना प्राथमिक समूह असे म्हणतात. याउलट त्या संबंधामध्ये व्यवहाराकरिता आहे जे संबंध कामापुरते आहेत असे संबंध असणाÚया व्यक्तींच्या समूहाला दुय्यम समूह असे म्हणतात. अषा प्रकारे समूहाचे वर्गीकरण करणे शक्य आहे.
चाल्र्स कूलेः-
संबंधाचे स्वरूपः
विविध निकसाच्या आधारे केलेल्या वर्गीकरणातून चाल्र्स कूले यांनी व्यक्तींमधील संबंधांच्या आधारे प्राथमिक आणि दुय्यम असे दोन संबंध स्पष्ट केले आहेत. प्राथमिक आणि दुय्यम समूह हे अत्यंत मूलभूत मानले जातात.
1) प्राथमिक समूहः
अमेरिकन समाजषास्त्रज्ञ चाल्र्स कूले यांनी 1909 साली सोशल आर्गनायझेशन या ग्रंथात प्राथमिक समूहाची संकल्पना मंाडली आहे. प्राथमिक समह म्हणजे काय हे स्पष्ट करताना चाल्र्स कूले असे म्हणतात कि, ज्या समूहात अतिषय निकटचे समोरासमोरचे व जिव्हाळयाचे संबंध आहेत. व ज्यातील सदस्यांमध्ये सहकार्य व परस्परांसाठी त्याग करण्याची भावना आहे अषा समूहाला प्राथमिक समूह असे म्हणतात. हे समूह व्यक्तीचे सामाजिक स्वरूप निष्चित करण्यास मुख्य आधार असतात.
कूले यांच्या मते समुहातील सदस्यामध्ये परस्परांबरोबर समोरासमोरचे सातत्याने येणारे संबंध असल्याने त्यांच्यात घनिष्ठ संबंध निर्माण होतात. सर्व सदस्यांमध्ये आपलेपणाची भावना व एकोपा तिव्रतेने दिसून येतो. समुहातील सर्व सदस्य समान ध्येय पूर्तीसाठी एकत्रितपणे अथवा विभक्तपणे प्रयत्न करतात.
उदा. कुटुंब या समुहामध्ये समोरासमोरचे व निकटचे संबंध आढळतात. सर्व सदस्यांमध्ये परस्परांसाठी त्याग करण्याची भावना आढळते सर्व सदस्य आपआपल्या मार्गानी प्रयत्न करून कुटुंबाचा विकास करण्याचा प्रयत्न करतात.
प्राथमिक समूह निर्माण होण्यास आवष्यक घटकः-
कोणताही प्राथमिक समूह निर्माण होण्यास तीन घटक अत्यंत आवष्यक आहेत.
1) सदस्यांतील भौतिक सान्निध्यः
प्राथमिक समूहातील निर्मितीसाठी सदस्यांमध्ये भौतिक सान्निध्य असणे आवष्यक आहे. सदस्य एकमेकांपासून दूर अंतरावर राहत असतील, त्यांच्यात फारसा संपर्क येत नसेल तर त्यांच्यात आपलेपणाची भावना निर्माण होणार नाही. भौतिक सान्निध्यामुळेच विचारांची, भावनांची आणि मानसिक आधाराची देवाण-घेवाण जास्त प्रमाणात होऊ शकते. यातूनच प्राथमिक समूह निर्माण होऊ शकते.
2) समूहाचा आकारः
समूहाच्या आकारावरच भौतिक सानिन्ध्य आणि निकटचे संबंध अवलंबून असतात. समूहाचा आकार मोठा असेल तर सदस्यांमध्ये निकटचे संबंध प्रस्थापित होऊ शकत नाहीत. याउलट समूह लहान असला तर व्यक्तींमध्ये भौतिक सान्निध्य परस्परांची वैयक्तिक ओळख परस्परांच्या सुख दुःखात समरस होण्याची वातावरण दिसून येते. यामुळेच संबंधातील व्यवहारीकता कमी होऊन आत्मियतेचे व जिव्हाळयाचे संबंध निर्माण होऊ शकतात.
3) संबंधातील सातत्यः
दुय्यम अथवा मोठया समूहामध्ये प्रस्थापित असणारे संबंध सातत्याने घडत नाहीत व्यक्ती परंस्परांबरोबर कामापुरते संबंध प्रस्थापित करतो. परंतु प्राथमिक संबंधासाठी समुहासाठी संबंध दीर्घकाळ यावे लागतात तरच घनिष्ठतता निर्माण होऊ लागते. संबंधात सातत्यपणा असला तरच भावनिक एकात्मता निर्माण होते. अषाप्रकारे प्राथमिक समूह निर्माण होतात.
उदा. कुटूंब, मित्र परिवार, नातेवाईक, शेजारी या सर्व समुहांमध्ये भौतिक सान्निध्य व संबंधातील सातत्यपणा असतो. त्याचा आकार लहान असल्यामुळे हे दोन्ही घटक शक्य होतात. म्हणूनच त्याला आपण प्राथमिक समूह असे म्हणतो. काही वेळा लोक सम्मेलन, साहित्य, परिषद किंवा सभेसाठी एकत्र येतात अषा लोकांचा समूह आकाराने लहान असतो. सदस्यांमध्ये भौतिक सान्निध्य आधि सातत्यपणे येणारा संबंध असे जरी असले तरी त्याला प्राथमिक समूह म्हणता येत नाही.
याचे प्रमूख कारण म्हणजे हे भौतिक सांन्निध्य आणि संबंध अल्पकालावधीचे असतात. संम्मेलन अथवा परिषद संपली कि, लोक प्रस्थापित झालेले संबंध विसरून जातात. म्हणून त्याला प्राथमिक समूह म्हणता येत नाही.
प्राथमिक समुहाची / समुहातील संबंधांची वैषिष्टयेः
प्राथमिक समूह ही संकल्पना अधिक समजावून घेण्यासाठी त्याची वैषिष्टये पाहणे आवष्यक आहे.
1) उद्दिष्टांची एकरूपताः
प्राथमिक समुहामध्ये उद्दिष्टांची एकरूपता दिसून येते. एकमेकांच्या हिताची काळजी घेतली जाते. प्राथमिक समूहाच्या सुखातच आणि विकासातच आपले सुख आणि विकास दडलेला आहे याची जाणीाव प्रत्येकाला असते. समूहाचा विकास झाला की आपला विकास होणारच याची जाणीव प्रत्येकाला असते. त्यामुळे सदस्य स्वतःपेक्षा समूहाला अधिक महत्त्व देतात.
उदाः कुटुंबातील एखादया सदस्याला नोकरी लागली कि त्याचा आनंद त्याच्यापुरता मर्यादित नसून कुटुंबात दिसून येतो. कुटुंबातील एखादा व्यक्ती आजारी असेल तर त्याची पिडा तो एकटाच सहन करीत नाही तर त्याचा त्रास सर्वांना होत असतो अषा प्रकारे समूहातील ध्येय उद्दिष्टये समान असून व्यक्ती वेगवेगळया मार्गाचा अवलंब करून ती उद्दिष्टये साध्य करण्याचा प्रयत्न करतात.
उदा. महाविद्यालयातील विद्यार्थी आपली उद्दिष्टये साध्य करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करतात. काही वेळा आपल्या मित्राकडून झालेल्या चुकांसाठी इतर मित्रदेखील षिक्षा भोगायला तयार असतात. म्हणूनच प्राथमिक समुहात एकरूपता आहे असे म्हणले जाते.
2) प्राथमिक संबंध टिकविणे हेच ध्येयः
प्राथमिक समुहामध्ये प्रस्थापित झालेले संबंध काही मिळविण्यासाठी अस्तित्वात आलेले नसतात. आई-वडिल, आपल्या वृदधकाळी मुलगा आपली काळजी घेईल म्हाून त्याची काळजी घेत नाहीत. ती आपली जबाबदारी आहे आणि मुलांनी भविष्यात दूर्लक्ष केले तरी चालेल तरी आई-वडिल त्याची काळजी घेत असतात.
It is not means to an end, but it is the means and the end. यानुसार प्राथमिक समूह ध्येयपूर्तीसाठी आवष्यक असणारे साधन नाही परंतु प्राथमिक समूह म्हणजे ध्येय आणि साधन होय. प्राथमिक संबंधातून कोणत्याही प्रकारची अपेक्षा केली जात नाही. काही वेळा व्यक्ती आपल्या मित्रासाठी अथवा कुटुंबीयासाठी कोणत्याही प्रकारचा त्याग करण्यास तयार असतात. संबंधांची किंवा त्यांग करणयची परतफेड व्हावी अषी अपेक्षा नसते. हाच त्यांच्यामधील मुख्य उद्देष आहे.
3) परस्पर संबंध व्यक्तीगत स्वरूपाचे असतातः
प्राथमिक समूहातील सर्व सदस्य परस्परांना वैयक्तिकरित्या ओळखत असतात. या समूहातध्ये व्यकित कोणत्या पदावर आहे तिची आर्थिक मिळकत किती या व्यावािरिक गोष्टींना महत्त्व नसून त्या व्यक्तीला महत्त्व असते.
उदा. एखादया बँकेमध्ये सर्वोच्च पदावार काम करणाÚया व्यक्तीला इतर सर्व लोक मानसन्मान देत असतात. जेव्हा तो व्यक्ती निवृत्त होतो तेव्हा कोणही त्याला महत्त्व देत नाही याचे कारण म्हणजे या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला महत्त्व नसून त्याच्या पदाला महत्त्व असते. परंतु प्राथमिक समूहामध्ये त्या व्यक्तीच्या पदाला महत्त्व नसून व्यक्तीला महत्त्व असते. तो व्यक्ती नसता तर संबंध प्रस्थापित झाले नसते. याबरोबरच प्राथमिक समूहातील सदस्यांना परस्परांच्या आवडी-निवडी , स्वभाव इच्छा-आकांक्षा सर्व माहित असतात. अषाप्रकारचे संबंध फक्त प्राथमिक समूहातच दिसून येतात.
4) प्राथमिक संबध स्वयंप्रेरीत असतात:-
प्राथमिक समुहातील संबध हे कोणत्या कारणामुळे निर्माण झोलेले नसतात. काही ध्येय साध्य करण्याकरीता व्यक्ती एकत्र येतात. भौतिक सानिध्य प्रस्थापित होते. सतत संबध येतात. यातून जवळीक व प्राथमिकता निमार्ण होत जाते. त्या व्यक्तींबरोबर आपले विचार जुळतात,ज्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहण्याने आपल्याला प्रसन्नता वाटते यातुन प्राथमिक संबध निर्माण होतात. कोणतीही व्यक्ती ठरवून प्राथमिक संबध निर्माण करू शकत नाही. किंवा इतर व्यक्तीच्या प्रयत्नाने देखील संबधात प्राथमिकता निर्माण होऊ शकत नाही. हे संबध उत्स्फुर्त पणे निर्माण होतात.
5) सदस्यांच्या वर्तणूकीवर अनौपचारिक नियंत्रण:-
प्राथमिक समुहातील सदस्य परस्परांच्या वर्तणूकीवर अनौपचारिक नियंत्रण ठेवीत असतात.
उदा. एखादा मित्र चुकीच्या मार्गाने जात असेल तर इतर सर्व मित्र त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात चुकीच्या मार्गापासून परावृत्त करतात. कुटूंबामध्ये देखील मुलाकडून चूक झाल्यास त्याला योग्य समज देऊन आई-वडील पुन्हा पहिल्यासारखे वागु लागतात. मुलाकडून चांगले कृत्य घडल्यास आई-वडील त्याला पारितोषिक किंवा बक्षिस देऊन त्या दिषेने जाण्यास त्याला प्रोत्साहित करतात. अषा प्रकारे सदस्यांवर अनौपचारिक नियंत्रण ठेवले जाते.
6) प्राथमिक स्वरूप:-
प्राथमिक समुहातील संबधामध्ये भावनिक एकता असते. मुले आई-वडिलांवर अन्न, वस्त्र, निवारा या गरजांसाठीच अवलंबून नसतात त्यांना यापेक्षाही अधिक हवे असते. भाविनक अधार हा फक्त कुटूंबाकडूनच मिळू शकतो. इतर कोणत्याही व्यक्तीपुढे आपण मन मोकळे केले तर त्याच्या परिणाम होत नाही. या उलट प्राथमिक समुहामध्ये जीवनातील लहान-सहान गोष्टींची देखील दखल घेतली जाते. आणि भावनिक आधार दिला जातो.
उदा. आपला मुलगा काॅलेजला जातो का? हे पाहण्यापुरतेच वडिलांचे कार्य नसते. मुलाच्या अडी-अडचणी समजावून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करून त्याला प्रोत्साहित करण्याचे कार्य देखील वडील करतात. अषा प्रकारचा आधार प्राथमिक समूहातच मिळू शकतो.
प्राथमिक समूहाचे महत्त्वः-
समाजषास्त्रज्ञांनुसार व्यक्ती आणि समाजासाठी प्राथमिक समूह अत्यंत आवष्यक आहे. व्यक्ती आपल्या आयुष्यातील सर्वात जास्त काळ प्राथमिक समूहात घालवितो. कुटुंब, मित्र शेजारी, नातेवाईक इत्यादी व्यक्तींच्या सान्निध्यात आयुष्यातील जास्तीत-जास्त वेळ व्यथित होतो. याबरोबरच व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा या तीन गरजांव्यतिरिक्त भावनिक, मानसिक, शारिरिक इ. अनेक गरजादेखील असतात. यांची पूर्तता प्राथमिक समूहातच होऊ शकते म्हणूनच प्राथमिक समूह अत्यंत आवष्यक आहे.
व्यक्तीचा जन्म हा कुटुंबासारख्या प्राथमिक समूहात होतो. या प्राथमिक समूहात मुलांचे संगोपन संवर्धन व समाजीकरणाची प्रक्रिया सुरू होते. प्राथमिक समूहात तो संस्कृती आत्सात करू लागतो. विविध प्रथा, पद्धती, सण, उत्सव यांची त्याला कल्पना येते. इतरांच्या सान्निध्यामुळे तो भाषा बोलू लागतो बÚया वाईट गोष्टींची त्याला कल्पना येऊ लागते. चांगल्या गोष्टी करण्यासाठी त्याला कुटूंबातून प्रोत्साहन व प्रेरणा मिळते. इतर सामाजिक भूमिकांची त्याला जाणीव होऊन तो एक जबाबदार नागरिक बनू लागतो. प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता या भावना किंवा आधार ज्या विकत मिळत नाहीत. ते प्राथमिक, समूहात न मागता मिळत असतात व्यक्तीला योग्य मार्गदर्षन मिळते. चुक णली असेल तर त्याला क्षमा करून पुन्हा उभे राहण्यासाठी प्रोत्साहन केले जाते. यामुळे व्यक्तीला मानसिक सुरक्षितता लाभते प्राथमिक समूहातील सदस्य हे व्यक्तीचे खरे हितचिंतक असतात त्यामुळे व्यक्तीचा विकास होण्यास मदत होते अषा प्रकारे प्राथमिक समूह महत्त्वाचा आहे.
2) दुय्यम समूहः
कूले यांनी प्राथमिक समूहातील जी संकल्पना मांडली त्याच्या बरोबर विरोधी परिस्थती ज्या समुहात दिसून येते त्याला दुय्यम समूह असे म्हणतात. हर्टन व हंट या विचारवंतानुसार दुय्यम समुह म्हणजे ज्या समुहात सामाजिक संपर्क हे व्यक्ती निरपेक्ष तुटक व उपयुक्तवादी असतात ज्या समुहामध्ये कामापुरते संबंध निर्माण झालेले असतात.ज्या समुहामध्ये कामापुरते संबंध निर्माण झालेले असतात ज्याच्यात प्राथमिकता नसते असे दुय्यम स्वरूपाचे संबंध ज्या समुहात आढळतात त्याला दुय्यम समूह असे म्हणतात.
प्राथमिक समुहाप्रमाणेच दुय्यम समूहात देखील व्यक्ती समान ध्येय साध्य करण्याकरिता एकत्र येतात परंतु त्याच्यातले संबंध हे कामापुरतेच मर्यादित राहतात.
उदा. एखादया कारखान्यामध्ये सर्व कामगार एकत्रितपणे वस्तूचे उत्पादन करण्यासाठी परस्परांच्या संपर्कत येतात कामगार संघटना देखील स्थापन करतात परंतु त्याच्या संबंधात प्राथमिकता दिसत नाही राजकीय पक्ष देखील त्यांतील सदस्य सत्ता मिळविण्यासाठी एकत्र येतील. परंतु, त्याच्यात प्राथमिकता निर्माण होत नाही. याषिवाय शहरी समुदयात अषा प्रकारे संबंध मोठया प्रमाणात आढळतात. व्यक्ती फक्त कामापुरते एकत्र येत असतात काम झाले कि, संबंध विसर्जित होतात. व्यक्तीपेक्षा त्याच्या कार्याला व पदाला महत्त्व असते. त्याला दुय्यम समूह असे म्हणतात ही संकल्पना अधिक समजावून घेण्यासाठी त्याची वैषिष्टये पाहणे आवष्यक आहे.
दुय्यम समूहाची वैषिष्टयेः
1) संबंध अप्रत्यक्ष व्यक्ती निरपेक्ष असतातः
दुय्यम समूहातील संबंध हे सहकार्याचे असले तरी व्यावहारिक स्वरूपाचे असतात. हे संबंध कामापुरते असतात. काम संपुष्टात आले कि, संबंध संपतात यात व्यक्तिला महत्त्व नसून पदाला असते.
उदा. बँकेतील कर्मचारी व खातेदार यांच्यातील संबंध खातेदाराची अपेक्षा असते कि,आपल्या खात्यातून पैसे मिळावेत बँकेतील कर्मचारी कोण आहे याची त्याला काळजी नसते. मालकदेखील नोकर कोण आहे? याचा विचार न करता आपल्या हाताखाली काम करण्यासाठी एक व्यक्ती आहे ज्याला पैसे दिले की तो काम करतो असा मर्यादित विचार करतो त्यामुळे दुय्यम समुहात संबंध व्यक्ती निरपेक्ष असतात.
2) आकाराचे बंधन नाहीः
प्राथमिक समुहामध्ये सदस्यांत समोरा-समोरचे व व्यक्तीगत संबंध असतात. त्यासाठी आकार लहान असणे आवष्यक आहे परंतु जेथे कामापुरते संबंध आहेत. तेथे आकाराचे कोणतेही बंधन नसते.
3) भौतिक सान्निध्याची आवष्यकता नाहीः
ज्या प्राथमिक समूहात व्यक्तीगत संबंध प्रस्थापित होण्यासाठी भौतिक सान्निध्य आवष्यक असते. असे सान्निध्य दुय्यम समुहात आवष्यक नाही. सदस्य वेगवेगळया प्रसार माध्यमांचा वापर करून परस्परांषी संपर्क साधू शकतात. भौतिक सान्निध्याची आवष्यकता नसते.
4) सदस्यत्व एैच्छिक स्वरूपाचे असतेः
व्यक्ती जन्म हा प्राथमिक समुहात होतो. त्याचे सदस्यत्व स्विकारणे अथवा न स्विकारणे हे व्यक्तीच्या हाती नसते. परंतु आपण या बँकेत काम करावे कि नाही त्या कारखान्यात नोकरी स्विकारावी या महाविद्यालयात षिकावे की परदेषात जावे हे निवडण्याचे सर्व अधिकार व्यक्तीजवळ असतात. दुय्यम समुहाचे सदस्यत्व स्विकारणे अथवा न स्विकारणे व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून असते.
5) साधन प्रधान दृष्टिकोनः
प्राथमिक समूहात सदस्यांचे संबंध हेच साधन आणि साध्य असते. संबंधातून काहीही अपेक्षीत नसते. संबंध टिकून राहण्यासाठी व्यक्ती हवी ती तडजोड करायला तयार असते. परंतु दुय्यम समुहामध्ये सदस्यांचे संबंध हे कामापुरतेच निर्माण झालेले असतात. एखादे ध्येय साध्य करण्यासाठी व्यक्ती परस्परांबरोबर संबंध प्रस्थापित करतात. दुय्यम समूहातील संबंध हे ध्येय साध्य करण्यासाठी एक साधन म्हणून वापरले जाते. (It is means to an end.)
उदा. टायपिंग क्लास चालविणारे षिक्षक व त्यांचे विद्यार्थी टायपिंग षिकण्यापुरते संबंध प्रस्थापित झालेले असतात. अषा प्रकारे दुय्यम समूह साधन म्हणून वापरला जातो.
6) करारात्मक स्वरूपः
दुय्यम समुहामध्ये संबंध करारात्मक स्वरूपाचे असतात. सदस्यांबरोबर कसे बोलावे वेळेचे पालन करावे कोणी कोणत्या जबाबदाÚया पार पाडव्यात कोणाला किती अधिकार आहेत या सर्व गोष्टी निष्चित असतात.
उदा. एखादया कारखान्यात कामाला वेळेवर जाणे, वरिष्ठांनी सांगितलेले सर्व ऐकणे नियमांचे काटेकारपणे पालन करणे इत्यादी विविध नियमांचे पालन प्रत्येकाला करावे लागते. बÚयाच दुय्यम समुहामध्ये नियम लिखित स्वरूपाचे असताता त्यामुळे त्याचे स्वरूप करारात्मक आहे असे म्हणले जाते.
7) संपर्क साधनांचा वापरः
प्राथमिक समुहामध्ये सदस्यांमध्ये संबंध हे वैयक्तिक समोरासमोरचे आणि निकटचे असतात. संपर्क साधण्यासाठी संपर्क माध्यमांचा वापर फारसा होत नाही. याउलट दुय्यम समुहात समोरासमोरचे संबंध येतात. टेलिफोन, पत्र व्यवहार इत्यादी संपर्क माध्यमांचा वापर करून संबंध प्रस्थापित होत असतात.
8) व्यक्तीमत्वाच्या मर्यादित भागांवर परिणामः
प्राथमिक समुहामध्ये व्यक्तीचा सर्वांगीन विकास होत असतो परंतु दुय्यम समुहामध्ये व्यक्ती कामापुरते एकत्रित आलेले असतात. या अल्प कालावधीतच ते परस्परांना प्रभावित करू शकतात.
उदा. बँकेतील कर्मचारी सहकार्याच्या सान्निध्यात राहताना बँकेतील कामकाजाची सर्व माहिती मिळवू शकतो परंतु यामुळे त्याचा भावनिक आध्यात्मिक विकास होत नाही हा विकास प्राथमिक समुहातच साध्य होऊ शकतो.
दुय्यम समुहाचे महत्त्वः-
दुय्यम समूह व्यक्ती आणि समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. व्यक्तीचा जन्म जरी कुटूंबासारखा प्राथमिक संस्थेत झालेला असला तरी त्याचा व्यावहारिक विकास दुय्यम समुहातच होतो. दुय्यम समुहाचे सदस्य झाल्याषिवाय व्यक्तीचा विकास होऊ शकत नाही. व्यक्तीची कार्यक्षमता वाढवू शकत नाही. कार्यक्षमता वाढविण्यासाठी कौषल्य प्राप्त करून विकास करण्यासाठी दुय्यम समुहाची आवष्यकता असते. दुय्यम समुहातील इतर सदस्य विकास करण्यासाठी प्रेरित करतात. व्यक्तींच्या पुढे ते एक आदर्ष असतात. व्यक्तींच्या पुढे आदर्ष असल्यामुळे तो गुण कौषल्य विकसीत करून स्वतःची प्रगती साधू शकतात दुय्यम समुहातील सदस्यांमध्ये कमी तीव्रतेची स्पर्धा असते. ते परस्परांबरोबर संघर्ष करून आपण श्रेष्ठ आहोत असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नामधूनच व्यक्तीची कार्यक्षमता आणि कौषल्य वाढवू शकतात. अषा प्रकारे व्यक्तीच्या विकासासाठी दुय्यम समुह महत्त्वाचा आहे. याबरोबरच व्यक्तीच्या विविध गरजाच्या पुर्ततेसाठी दुय्यम समुह उत्तम संधी देतो. दुय्यम समुहाच्या वाढत्या प्रमाणामुळे व्यक्तीच्या दर्जा अधिक कुषलतेने पूर्ण होऊ लागल्या आहेत. दुय्यम समुहामुळे विषेषीकरणाला महत्त्व प्राप्त झाले यामुळे प्रतयेक विषयात प्रभुत्व असणारी व्यक्ती निर्माण होऊ लागली. हे विषेष व्यक्ती इतरांच्या गरजा सहजपणे पूर्ण करू लागलेली आहेत.
प्राथमिक समुहाबरोबरच दुय्यम समुह देखील समाजासाठी आवष्यक आहे. ज्याप्रकारे व्यक्ती भावनिक विकासासाठी प्राथमिक समुहावर अवलंबून असतो. तसेच व्यावहारिक विकासासाठी दुय्यम समुहावर अवलंबून राहवे लागते. अषा लहान मोठया समुहातूनच समाजाची निर्मिती होत असते. समाजाचे सातत्य, स्थैर्य आणि सुरक्षितता दुय्यम समुहावर पूर्णतः अवलंबून असते. अषा प्रकारे दुय्यम समुह व्यक्ती आणि समाजासाठी महत्त्वाचा मानला जातो.
दुय्यम व प्राथमिक समुहाची परस्पर पुरकता व फरकः-
आधुनिक काळात दुय्यम समुहाची संख्या मोठया प्रमाणात वाढू लागली आहे. सामान्य व्यतींना तीचे महत्त्व पटल्यामुळे दुय्यम समुहाची संख्या वाढू लागली आहे. समाजाच्या अस्तीत्वासाठी ज्या प्रकारे प्राथमिक समुह महत्त्वाचे आहेत त्याचप्रकारे दुय्यम समुह देाील नितकेच आवष्यक आहे कोणत्याही संबंधामध्ये सुरुवातीला प्राथमिकता नसते. सर्वात पहिल्यांदा संपर्क आलेल्या व्यक्तीमध्ये जिव्हाळा, आत्मीयतेचे संबंध नसतात. त्याच्या संबंधामध्ये औपचारिकता असते. संबंध सातत्याने येऊ लागतात त्या संपर्काचे रूपांतर घनिष्ठ संबंधांमध्ये होते. हळूहळू जिव्हाळा आत्मीयता वाढू लागते. परस्परांसाठी त्याग करण्याची भावना निर्माण होते. यावरून असे दुय्यम समुहातून होत असते. हे दोन्ही समुह अलिप्तपणे असू शकत नाहीत कारण प्राथमिक समुह व्यक्तींच्या भावनिक व मानसिक गरजांची पूर्तता करते. तर दुय्यम समूह व्यक्तीच्या भौतिक गरजा पूर्ण करते.
यक्तीचा फक्त भावनिक विकास करून चालत नाही तर त्याच्या भौतिक गरजांची पूर्तता होणे देखील आवष्यक आहे. म्हणूनच व्यक्तींसाठी हे दोन्ही समुह आवष्यक आहे.
प्राथमिक व दुय्यम समुहातील फरकः-
1) आकारः
प्राथमिक समुहामध्ये आकार हा मर्यादित असतो. लहान आकारामुळेच संबंध सातत्यपणे येतो. यात घनिष्ठता निर्माण होते. आाणि परस्परांसाठी जिव्हाळा आत्मीयता वाढू लागते. याउलट दुय्यम समुहामध्ये आकार हा अत्यंत विषाल असतो. मोठया आकारामुळे संबंधात घनिष्ठता निर्माण होते आणि परस्परांसाठी जिव्हाळा आत्मीयता वाढू लागते. या उलट दुय्यम समुहामध्ये आकार हा अत्यंत विषाल असतो. मोठया आकारामुळे संबंधात घनिष्ठता निर्माण होत नाही. सर्व संबंध कामापुरते असतात.
2) संबंधः
प्राथमिक समुहातील संबंध पूर्णतः अनौपचारिक स्वरूपाचे असतात सदस्यांमध्ये जिव्हाळा, आत्मीयता, त्याग करण्याची भावना आणि संबंध टिकवीणे हेच ध्येय असते. तर दुय्यम समुहामध्ये संबंध व्यावहारिक करारात्मक व कामामुरते असतात.
3) गरजांची पूर्तताः
प्राथमिक समूह प्रामुख्याने व्यक्तीच्या भाावनिक व मानसिक गरजांची पूर्तता करते तर दुय्यम समुह व्यक्तीच्या भौतिक गरजा पूर्ण करते.
4) व्यवस्थाः
प्राथमिक समुहातील संबंधामध्ये निष्चित व्यवस्था नसते. अधिकाराची आदला बदल होऊ शकते. कोणाला किती अधिकार आहेत किंवा भूमिका स्पष्ट करता येत नाहीत याउलट दुय्यम समुहामध्ये सर्व संबंध करारात्मक स्वरूपाचे असतात. प्रत्येकाचे अधिकार भूमिका कार्य व त्याच्या मर्यादा सर्व स्पष्ट असतात.
आंतरसमुह/ बहिरसमुह/ गटः-
विल्यम सम्नर या विचरावंतानी समुहाचे सदस्य या तत्त्वाच्या आधारे सामाजिक समुहाचे वर्गीकरण केले आहे. त्याच्यामते व्यक्ती ज्या गटाचा सदस्य असतो ते सर्व गट व्यक्तीसाठी आंतरसमुह असतात.
उदा. एखादे व्यक्ती कुटूंबाचा, काॅलेजचा, जातीचा, धर्माचा, देषाख एकाच वेळी सदस्य असतो. हे सर्व समुह त्याच्यासाठी आंतरसमुह म्हणून ओळखले जातात. याउलट व्यक्ती ज्या गटाचा सदस्य नाही ते त्यांच्यासाठी बहिरगट असतात.
उदा. एखादया व्यक्ती बँकेत नोकरी करीत नसेल तर बँकेतील कर्मचाÚयांच्या ती सदस्य नसते. हा गट त्याच्यासाठी बहिरगट असतो. यावरून असे दिसून येते की, व्यक्ती एकाच वेळी ज्या गटाचा सदस्य असतो ते त्याच्यासाठी आंतरगट असतात. व ज्या गटाचा सदस्य नसतो. ते त्याच्यासाठी वेगवेगळे असू शकते.
व्यक्ती ज्या गटाचा सदस्य असतो त्या गटातील सदस्यांबरोबर आपलेपणाची भावना व आपण एक आहोत अशी कल्पना असते. आंतर गटातील सदस्यांमध्ये एकात्मतेची भावना आढळते. व्यक्तींमध्ये अषी जाणीव असते कि, समुहाच्या हितामध्ये आपले हित दडले आहे. आपल्या समुहाचा विकास झाला कि, आपला देखील विकास होणार आहे. या बरोबरच आपल्या वैयक्तिक प्रयत्नांमुळे आपली प्रगती झाली तर आपल्या समुहाचा देखील विकास होतो. व्यक्ती आणि अंतरसमुह परावलंबी आहे.
अंतरगटातील सदस्यांमध्ये सहानुभूती व आत्मीयतेची भावना असते. परस्परांबद्दल आदर असतो. सदस्यांमध्ये मतभेद नसतात. परस्परांमध्ये सहकार्याची व त्याग करण्याची भावना असते. आपल्या समुहातील इतर सदस्यांना कोणताही त्रास देण्याची इच्छा नसते. कारण सदस्य पिडीत झाले कि, त्याचा परिणाम आपल्याला देखील सहन करावा लागणार याची कल्पना असते. सर्व सदस्य सण, उत्वस, छोटे-मोठे समारंभ आनंदाने एकत्रितपणे साजरे करतात. आंरगटातील सदस्य आपण इतरांपासून वेगळे आहोत हि, निदर्षनास आणण्याचा प्रयत्न करतात. स्वतःला संबोधताना आम्ही या शब्दाचा वापर करतात व इतर गटातील सदस्यांसाठी ते किंवा तुम्ही या शब्दाचा वापर होतो. स्वतःच्या गटातील सदस्यांबद्दल आत्मीयतेची भावना असली तर इतर गटातील सदस्यांकडे तुच्छतेने किंवा तिरस्काराच्या भावनेने पाहिले जाते.
आंतरगटातील सदस्यांबरोबर संबंध प्रस्थापित करताना आणि बहिरगटातील सदस्यांबरोबर संबंध प्रस्थापित करताना वेगवेगळया नियमाचा अवलंब केला जातो. उदा. एखादया व्यक्तीने आपल्या जातीला जोडीदाराची निवड केली तर त्या मुलीला कुटूंबात सहजपणे स्विकारले जाते. परंतु दुसÚया जातीला जोडीदाराबरोबर विवाह केला तर त्या मुलीला / व्यवस्थितपणे वागवले जात नाही दोन्ही समुहाच्यासाठी वेगवेगळे नियम दिसून येतात.
सर्वसाधारणपणे एक व्यक्ती एकावेळी अनेक गटाचा सदस्य असू शकतो.
उदा. कुटुंबामध्ये मुलाची, पतीची भूमिका बँकेत सहकार्याची तर या व्यक्तीची पत्नी शाळेमध्ये षिक्षिका असू शकते. प्रत्येक व्यक्तीसाठी आंतरगट आणि बहिरगट वेगवेगळे असतात. कुटुंबाचा विचार करताना या दोन्ही समुहाचे स्वरूप सममिश्र आहे असे म्हणले जाते.
आंतरगटामध्ये स्वसमुह श्रेष्ठवाद ही भावना आढळते या भावनेनुसार आपला समुह इतर समुहांपेक्षा श्रेष्ठ आहे. असे प्रत्येकाला वाटते. परंतु या भावनेबरोबर इतरांचा समुह कनिष्ठ आहे. हे देखील वाटते ही भावना देखील संमिश्र स्वरूपात आढळते.
संदर्भ समूह:-
व्यक्ती आपले जीवन विविध सामुदायिक सभासद या नात्याने जगते. समूहांची नियमने आणि मुल्ये व्यक्तींनी आत्मसात केलेली असतात. त्यामुळे व्यक्ती समूहात असो अथवा समूहाबाहेर व्यक्ती समुहाच्या नियमानुसार सहजगत्या वागत असते. समूहाचा आपल्या जीवनपद्धतीवर वर्तनावर, भावना, अभिवृत्ती, मुल्ये, मते आदर्ष तत्त्वज्ञान इ. वर जबरदस्त प्रभाव पडलेला असतो. योच कारण असे आहे की आपण काही प्रमाणात समूहाषी एकरूप् झालेले असतो. व्यक्तीच्या सर्व गरजा उदा. मानसिक, बौद्धिक, षाररिक इ. गरजा समुहातच पूर्ण होतात. कारण व्यक्ती समुहाच्या नियमानुसार वर्तन करीत असते. परंतु व्यक्ती ज्या समूहाचे सदस्य असते फक्त तोच समूह व्यक्तीचे वर्तन प्रभावीत करीत नाही तर इतर ज्या समुहाचे व्यक्ती सदस्य नसते तर ते समुह देखील व्यक्तीला प्रभावीत करीत असतात असे जे समूह व्यक्तीच्या वर्तनाला प्रभावित करतात त्यांना संदर्भ समूह असे म्हणतात.
व्याख्या:-
1) वर्तनाचे मूल्यमापन करण्यासाठी ज्या समूहांच्या नियमानांचा मानदंड म्हणून वापर केला जातो त्याला संदर्भ समूह असे म्हणतात.
A group whose norms are used as a standard to evaluate behaviour.
2) एखादी व्यक्ती स्वतःचे मूल्यमापन करण्यासाठी ज्या समूहाचा संदर्भ घेते त्याला संदर्भसमूह असे म्हणतात.
3) व्यक्ती आपल्या श्रद्धा, अभिवृत्ती मूल्ये यांची व्याख्या करण्यासाठी आणि आपल्या वर्तनाला दिषा देण्यासाठी ज्या समूहाचा वा सामाजिक प्रवर्गाचा वापर करते त्याला संदर्भ समूह असे म्हणतात.
4) हॅरी जाॅन्सन:- स्वतःचे स्वतःच्या परिस्थीतीचे व्यक्तीगत आकांक्षाचे किंवा स्वतःच्या समूहाचे वा त्याच्या आकांक्षाचे मूल्यमापन करताना वापरण्यात येणा-या संदर्भ चैकटीचा भाग असणा-या वास्तव वा कल्पित अषा कोणत्याही समूहाविषयीचे व्यक्तीचे संकल्पन हा एखादया व्यक्तीचा संदर्भ समूह असू षकतो.
संदर्भ समूहाचे प्रकार
1) नकारात्मक संदर्भ समूह
2) आकांक्षित संदर्भ समूह
नकारात्मकः-
एखादी व्यक्ती कषाचा त्याग करावा वा कषाला विरोध करावा यासंबंधी दिषा पा्रप्त व्हावी म्हणून ज्या समूहाचा व त्याच्या क्रियंाचा वापर करते त्या समूहाला नकारात्मक संदर्भसमूह असे म्हणतात.
या व्याख्येवरून असे आपण म्हणू षकतो की नकारात्मक संदर्भ समूहाच्या विरुद्ध वर्तन प्रकारंाचा व मुल्यांचा व्यक्ती स्वीकार करते.
आकांक्षित संदर्भ समूह:-
ज्या समूहात सदस्य म्हणून आपल्याला मान्यता मिळावी अषी व्यक्तीची इच्छा असते त्याला आकांक्षित संदर्भ समूह असे म्हणतात.
अषा संदर्भ समूहात सदस्य होण्यासाठी काही विषिष्ट नियम किंवा अटींची पूर्तता होणे आवष्यक आहे.
उदा. होण्यासाठी मंत्री होण्यासाठी होण्यासाठी काही पुर्तता करणे जरूरीचे आहे.
संदर्भ समूहांची संकल्पना समजावून घेण्यासाठी काही घटक समजावून घेणे आवष्यक आहेत.
1) एखादया प्रत्यक्षात किंवा अस्तित्वात असलेल्या किंवा कल्पित समूह व्यक्तीसाठी संदर्भ समूह असू षकतो.
2) संदर्भ समूहाविषयी व्यक्ती पूर्ण ज्ञान असलेच असे नाही.
3) संदर्भ समूहात सेनादला सारखा समूह असू ष्सकतसे किंवा षिक्षक डाॅक्टर्स जिल्हाधिकारी सारखे प्रवर्ग असू षकतात.
4) एक समूह हा दुस-या समूहाकरीता संदर्भ असू षकतात. त्यात एखादा नकारात्मक संदर्भ समूह देखील असू षकतो.
5) सकारात्मक संदर्भसमूहातील व्यक्तीप्रमाण्ेा वागण्याचा अथवा त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न व्यक्ती करू षकते
6) नकारात्मक सदंर्भ समूहातील व्यक्तींच्या वर्तनाच्या उलट वर्तन स्विकारले जातात.
7) प्रत्येक च्यक्तीचे संदर्भ समूह वेगवेगळे असू षकतात.
- हॅरी जाॅन्सन यांनी संदर्भ समूह असण्याची कारणे स्पष्ट केली आहेत. त्यांच्यामते चार परिस्थीतीमुळे व्यक्ती एखादया समूहाला संदर्भ समूह म्हणून स्विकारतो.
1) एखादया समूहातील काही व्यक्ती अथवा सर्व व्यक्ती दुस-या एखादया समूहाच्या प्रत्यक्ष समूहाच्या प्रत्यक्ष सभासद होण्याची इच्छा बाळगून असतील तेव्हा दूस-या समूह पहिल्यासाठी संदर्भ असतो.
2) जेव्हा एखादया समूहातील सदस्य दुस-या समुहातील सदस्यांसारखे होण्याचा प्रयत्न करतात तेव्हा दुसरा समूह पहिल्यासाठी संदर्भ समूह असतो.
3) आपल्यात आणि दुस-या समूहात काही सारखे नाही असे समाधान वाटते तेव्हा दुसरा समुह आपल्यासाठी नकारात्मक संदर्भ समूह असतो.
4) स्वतःचया वर्तनाचे मुल्यंाकन करण्यासाठी दुस-या समुहाचे संदर्भ घेतले तर दुसरा समुह संदर्भ समूह असतो.