सामने निश्चिती
कोणत्याही गैरमार्गाचा वापर करून मॅचचा निकाल हवा तसा करून घेण्याच्या प्रयत्नाला मॅच फिक्सिंग (सामने निश्चिती) म्हणतात. अशा प्रयत्नांत अडकलेले क्रिकेट खेळाडू आणि फ्रँचायझी :
हा बांगला देशचा ऑलराऊंडर खेळाडू ५६ कसोटी सामने खेळला आहे. त्यांत त्याने पाच शतके व २४ अर्धशतके केली आहेत. २०१९ नोव्हेंबरपर्यंत त्याने एकूण ३,८६२ धावा केल्या आहेत. ह्या सामन्यांत त्याने २१० बळी घेतले आहेत.
खेळलेल्या एकूण २०६ एकदिवसीय सामन्यांमध्ये शाकिबने नऊ शतके व ४७ अर्धशतके केली आहेत, २६० बळी घेतले आहेत आणि एकूण ६,३२३ धावा केल्या आहेत.
७६ टी-ट्वेंटी सामन्यांत शाकिबने जरी एकही शतक केले नसले तरी नऊ अर्धशतके केली आहेत. गोलंदाजी करून त्याने ह्या सामन्यांत एकूण ९२ बळी घेतले आहेत.
अशा ह्या अष्टपैलू खेळाडूशी सामने निश्चिती करून सट्टा खेळणाऱ्या बुकीने -दीपक आगरवालने- २०१८ साली तीनदा संपर्क केला होता. शाकिबने ही माहिती ICC-International Cricket Council-आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेपासून लपवली. त्याबद्दल सजा म्हणून शाकिबला २९ ऑक्टोबर २०२०पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळता येणार नाहीत.
मार्क वाॅ-शेन वाॅर्न
जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेचा दौरा करीत होता, तेव्हा या दोघे ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडूंना भारतीय सट्टेबाजांना माहिती देण्याच्या मोबदल्यात लाच घेतल्याच्या आरोपावरून दोषी ठरवले होते. त्यानंतर १९९५ साली ऑस्ट्रेलियाच्या तीन क्रिकेट खेळाडूंनी-मार्क वाॅ, शेन वाॅर्न आणि गोलंदाज टिम मे यांनी आरोप केला होता, की जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानमध्ये खेळत होता तेव्हा पाकिस्तानचा एक प्रमुख खेळाडू सलीम मलिक याने पैसे घेऊन मॅच हरण्याची विनंती केली होती.
मोहम्मद अझरुद्दीन
मोहम्मद अशरफुल
हँन्सी क्रोन्ये
किस क्रेन्स व ल्यू व्हिन्सेन्ट
अजय जाडेजा
मनोज प्रभाकर
अजय शर्मा
कपिलदेव
पाकिस्तानचा मोहम्मद आमिर
भारताचा शांताकुमारन श्रीशांत
फ्रँचायझी
सामनेनिश्चिती आणि सट्टेबाजीप्रकरणी एका भारतीय फ्रँचायझी प्रवर्तकाला तुरुंगवास झालानी दोन फ्रँचायझींचे दोन वर्षांसाठी निलंबन झाले.
(अपूर्ण लेख)