Jump to content

साबुदाण्याची लापशी

साहित्य

  • १ टेबल चमचा साबुदाणा
  • १ कप दूध
  • २ चमचे साखर.

कृती

साबुदाणा थोडावेळ धुऊन ठेवावा, नंतर १/२ कप पाण्यात साबुदाणा शिजवून घ्यावा. वाटल्यास थोडेसे आणखी पाणी घालावे. नंतर त्यात दूध व साखर घालून थोडा वेळ शिजवावे. मग खालती उतरवून गार किंवा गरम आवडी प्रमाणे द्यावी. आयत्यावेळी त्यात चिमूटभर मीठ घातल्यास ही लापशी चांगली लागते.

संदर्भ

http://www.marathiworld.com/ann-he-purnabramha-m/sabudanakhichadi