Jump to content

साबरमती आश्रम

साबरमती आश्रम

साबरमती आश्रम हा भारतातील गुजरात राज्यातील अमदावाद शहराजवळ साबरमती नदीच्या किनाऱ्यावर आहे. याची स्थापना महात्मा गांधींनी १७ जून इ.स. १९१७ साली केली होती.[] दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधी आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा यांचे हे निवासस्थान बनले.[]

हरिजनांचा आश्रम

तत्कालीन समाजातील अस्पृश्य लोकांना गांधीजी यांनी "हरिजन" असे संबोधले आणि या व्यक्तींच्या विकासासाठी साबरमती आश्रमात विशेष कार्य केले गेले.[]

आश्रमातील प्रदर्शन

साबरमती आश्रमात महात्मा गांधी यांचा इतिहास आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदान व घडामोडी यांचे दर्शन घडवणारे कायमस्वरूपी प्रदर्शन उभारलेले आहे.या माध्यमातून महात्मा गांधींचे विचार, मूल्ये आणि शिकवण जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

संदर्भ

  1. ^ ग्रुप, एसएसजीसी. Monthly Current Affairs August 2017: Monthly Current Affairs August 2017 (हिंदी भाषेत).
  2. ^ मलिक, शिवा एन. (२००६). बुक्स.गूगल.को.इन - Dehātī Gāndhī: bhakta Phūlasiṃha jīvana-vr̥tta 1885-1942 Check |url= value (सहाय्य) (हिंदी भाषेत). शिव लक्ष्मी विद्या धाम.
  3. ^ पासवान, संजय; जयदेवा, प्रमांशी (२००२). Encyclopaedia of Dalits in India: Movements (इंग्रजी भाषेत). ज्ञान पब्लिशिंग हाउस. ISBN 9788178350349.