साबण हे विविध साफसफाई आणि स्नेहन उत्पादनांमध्ये वापरले जाते. घरगुती वातावरणात हे सहसा धुणे, आंघोळ आणि इतर प्रकारच्या घरकामासाठी वापरले जातात. औद्योगिक कामात, साबण घट्ट करणारा पदार्थ म्हणून, काही वंगणांचा घटक आणि उत्प्रेरकांचे पूर्ववर्ती म्हणून वापरले जातात.
इतिहास
साबणाचा शोध सर्वप्रथम कोणी लावला हे अनिश्चित आहे.[१] हजारो वर्षांपासून मानवाने साबण वापरला आहे; २८०० ईसापूर्व प्राचीन बॅबिलोनमध्ये साबणासारखी सामग्री तयार केल्याचा पुरावा अस्तित्वात आहे.[२][३] २५०० ईसापूर्व सुमेरियन मातीच्या फलकावर साबण बनवण्याचे सूत्र लिहिले गेले जे तेल आणि लाकडाची राख यांचे मिश्रण गरम करून केले जात असे. ही सर्वात जुनी रासायनिक अभिक्रिया नोंदवली गेली आहे आणि लोकरीचे कपडे धुण्यासाठी ह्याचा वापर होत असे.[४]
^Willcox, Michael (2000). "Soap". In Hilda Butler (ed.). Poucher's Perfumes, Cosmetics and Soaps (10th ed.). Dordrecht: Kluwer Academic Publishers. p. 453. ISBN 978-0-7514-0479-1. 2016-08-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. The earliest recorded evidence of the production of soap-like materials dates back to around 2800 BCE in ancient Babylon.
^Veerbek, H. (2012). "1 Historical Review". In Falbe, Jürgen (ed.). [[[:साचा:Google Books]] Surfactants in Consumer Products] Check |url= value (सहाय्य). Springer-Verlag. pp. 1–2. ISBN 9783642715457 – Google Books द्वारे.