Jump to content

सापुतारा

सापुतारा येथील तलाव.

माहिती

सापुतारा हे स्थळ भारताच्या गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक या शहरापासून सुमारे ९१ कि.मी. अंतरावर नाशिक-डांग-सुरत रस्त्यावर आहे. हे ठिकाण गुजरात राज्याच्या वांसदा राष्ट्रीय उद्यानाजवळ आहे. मुंबई अथवा अहमदाबाद येथून रेल्वेने बिलिमोरा या स्थानकापर्यंत जाऊन तेथून बसने अथवा टॅक्सीने येथे येता येते. गुजरात-महाराष्ट्र राज्यसीमा येथून सुमारे ५ कि.मी. अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे १००० मीटर उंचीवर असलेले सापुतारा हे स्थान सातपुडा पर्वतराजीवर एका पठारासारख्या ठिकाणी वसलेले आहे.

तपमान

सनसेट पॉईंट येथून दिसणारे दरीचे दृष्य.

उन्हाळ्यात येथे २७ ते ३१ सेल्सियस एवढे तापमान असते. .हिवाळ्यात ते ९ ते २० सेल्सियस या दरम्यान राहू शकते.

पाहण्यासारखी ठिकाणे

गीरा धबधबा
  • अ‍ॅक्वेरियम
  • एको पॉईंट
  • कलाकारांचे खेडे (आर्टिस्ट्‌स व्हिलेज)
  • मध संकलन केंद्र
  • गीरा धबधबा
  • बोट क्लब
  • म्युझियम (संग्रहालय)
  • रोप-वे
  • सनराइज पॉईंट
  • सनसेट पॉईंट
  • हथगढ किल्ला

पोहचण्याचा मार्ग

  • जवळील विमानतळ- सुरत- १७२ किमी.
  • जवळील रेल्वेस्टेशन- बिलीमोरा- १७२ किमी
  • नाशिक शहरापासूनन रस्त्याने सुमारे ८० कि.मी.
  • मुंबई शहरापासून सुमारे १८५ कि.मी.
  • सुरत शहरापासून सुमारे १७२ कि.मी.

बाह्य दुवे