सान हुआन काउंटी, कॉलोराडो
हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील सान हुआन काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सान हुआन काउंटी (निःसंदिग्धीकरण).
सान हुआन काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४ काउंटींपैकी एक आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७०५ असून [१] ही कॉलोराडोतील सर्वात कमी लोकसंख्या असलेली काउंटी आहे. सिल्व्हर्टन येथील प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर आहे. [२] या काउंटीला या प्रदेशातील पर्वतरांगेचे नाव दिले आहे. सान हुआन काउंटीची सरासरी उंजी ३,४२६ मी (११,२४० फूट) असून ही अमेरिकेतील सर्वाधिक उंचीवर असलेली काउंटी आहे.
चतुःसीमा
- यूरे काउंटी - उत्तर
- हिन्सडेल काउंटी – पूर्व
- ला प्लाटा काउंटी - दक्षिण
- मॉन्टेझुमा काउंटी – नैऋत्य
- डोलोरेस काउंटी - पश्चिम
- सान मिगेल काउंटी – वायव्य
प्रमुख रस्ते
- यूएस हायवे ५५०
हे सुद्धा पहा
संदर्भ आणि नोंदी
- ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. September 5, 2021 रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.