सॅन मटेओ काउंटी ( /ˌsænməˈteɪ.oʊ/) ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक काउंटी आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,६४,४४२ होती. [१] या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र रेडवूड सिटी येथे आहे. [२] डेली सिटी आणि सान मटेओनंतर ही येथील इतर दोन मोठी शहरे आहेत. सान मटेओ काउंटीचा समावेश सान फ्रान्सिस्को-ओकलँड-बर्कले मध्ये होतो. ही काउंटी सिलिकॉन व्हॅलीमध्ये आहे. सान फ्रान्सिस्को खाडी या काउंटीला लागून आहे. सान फ्रान्सिस्को द्वीपकल्पाचा मोठा भाग या काउंटीत आहे. सान फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ या काउंटीच्या ईशान्य भागात आहे. या काउंटीमध्ये अनेक मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांची मुख्यालये आहेत.
विमानतळ
सान फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ सान मटेओ काउंटीमध्ये असला तरीही त्याची मालकी सान फ्रान्सिस्को शहर आणि काउंटीकडे आहे.