सान इग्नासियो (बेलीझ)
हा लेख बेलीझमधील शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सान इग्नासियो (निःसंदिग्धीकरण).
सान इग्नासियो बेलीझ देशाच्या कायो जिल्ह्यातील शहर आहे. जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१५ च्या अंदाजानुसार २०,५८२ होती.
हे शहर मॅकाल नदीकाठी वसलेले आहे. सांता एलेना हे सान एकेकाळी इग्नासियोचे जोडशहर होते. ते आता सान इग्नासियोमध्येच शामिल झाले आहे.
येथून जवळ प्राचीन माया संस्कृतीचे अवशेष काराकोल, सुनान्तुनित्स, एल पिलार, इ. ठिकाणी आहेत.