सान्तियागो बेर्नाबेऊ स्टेडियम
सान्तियागो बेर्नाबेऊ स्टेडियम | |
---|---|
मागील नावे | Nuevo Estadio Chamartín (१९४७–५५) |
स्थान | माद्रिद, स्पेन |
उद्घाटन | १४ डिसेंबर १९४७ |
पुनर्बांधणी | १९८२, २००१ |
मालक | रेआल माद्रिद |
बांधकाम खर्च | १७.३२ लाख युरो |
आसन क्षमता | ८५,४५४ |
संकेतस्थळ | संकेतस्थळ |
वापरकर्ते संघ/स्पर्धा | |
रेआल माद्रिद स्पेन |
सान्तियागो बेर्नाबेऊ स्टेडियम (स्पॅनिश: Estadio Santiago Bernabéu) हे स्पेन देशाच्या माद्रिद शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. रेआल माद्रिद ह्या लोकप्रिय फुटबॉल क्लबच्या मालकीचे असलेले हे स्टेडियम जगामधील सर्वात प्रसिद्ध व प्रतिष्ठित फुटबॉल स्टेडियमपैकी एक मानले जाते.
आजवर येथे १९८२ फिफा विश्वचषक व १९६४ युरोपियन देशांचा चषक ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे अंतिम सामने तसेच युएफा चँपियन्स लीगच्या १९५७, १९६९, १९८० व २०१० हंगामांमधील अंतिम फेरीचे सामने खेळवले गेले आहेत.