सातीवळी
?सातीवळी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | .३४४४८ चौ. किमी |
जवळचे शहर | पालघर |
जिल्हा | पालघर जिल्हा |
लोकसंख्या • घनता | १,३५३ (२०११) • ३,९२८/किमी२ |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | आदिवासी कातकरी |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • ४०१३०३ • +०२५२५ • एमएच४८ |
सातीवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यात असून, उत्तर कोकणातल्या पालघर तालुक्यातले एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
सफाळे रेल्वे स्थानकापासून पूर्वेस तांदुळवाडी मार्गाने गेल्यावर वरई फाट्यावर उजवीकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ने मुंबईकडे जाताना भालीवळी गावानंतर हे गाव लागते. सफाळे रेल्वे स्थानकापासून हे गाव ४५ किमी अंतरावर आहे.
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २९४ कुटुंबे राहतात. एकूण १३५३ लोकसंख्येपैकी ६९४ पुरुष तर ६५९ महिला आहेत. गावाची साक्षरता ५९.४६ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६९.२८ आहे तर स्त्री साक्षरता ४९.२० आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २०६ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १५.२३ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात; अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन,बकरीपालनसुद्धा करतात.
नागरी सुविधा
गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते, वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठरावीक वेळी असतात. याच स्थानकावरून ऑटोरिक्षाही मिळतात.
जवळपासची गावे
बोट, दहिसर तर्फे मनोर, साखरे, नावझे, गुंदावे, वेहलोळी, सावरे, खैरे, जानसई, ढेकाळे, वरई ही जवळपासची गावे आहेत.
संदर्भ
१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html