सातविण
सातवीण |
---|
शास्त्रीय वर्गीकरण |
मराठी नाव
सातवीन, सप्तपर्णी
इंग्रजी नाव
Apocynaceae सातवीण किंवा सप्तपर्णी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. वेगवेगळ्या भाषांमधून वेगवेगळ्या नावाने हा व्रुक्ष ओळखला जातो.
- संस्कृत-सप्तपर्णी/सप्तच्छद
- हिंदी-सातविन/सतिआन
- बंगाली-छातीम
- कानडी-हाले/कडूसले
- गुजराती-सातवण
- तामिळ-एळिलाप्पाले
- तेलुगू-एडाकुलरिटिचेट्टू
- इंग्रजी-Indian devil tree, Ditabark
माहिती
मुंबईत बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला पिवळा, सोनमोहर, गुलमोहर, सुबाभूळ, रेन ट्री, पिंपळ, भेंड, असुपालव इत्यादी वृक्ष दिसतात. यांची रोपे सहज उपलब्ध होत असल्याने पूर्वी या वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड होत असे. अजूनही होते. पण किंग्ज सर्कल, फाइव्ह गार्डन, हिंदू कॉलनी, पोद्दार कॉलेज या भागात जरा निराळे, नवीन दुर्मिळ वृक्ष पाहायला मिळतात. सॉसेज ट्री, गुलाबी टॅबेबुया, टिकोमा, महोगनी, पडौक, गिरिपुष्प, सप्तपर्णी, पुत्रंजीवा असे अनेक वृक्ष काही भागात आहेत. सप्तपर्णीचे हेच तर वैशिष्ट्य आहे. फुले आलेली असतात पण ती सहजपणे दिसत नाहीत...पण फुलांच्या सुगंधावरून कळते. विशेषकरून संध्याकाळी. पानांच्या दातीमध्ये पानांच्या वर,उंच देठावर आलेल्या हिरवट पांढऱ्या, पंचकोनी फुलांचे गुच्छ सहजपणे दिसत नाहीत. मुंबईसारख्या शहरात, पावसाळा संपल्यावर शरद ऋतूत सप्तपर्णीला फुले येतात. फुलांचा बहार फार काळ टिकत नाही. फुले गळून पडल्यावर वितभर लांब, बारीक चवळीसारख्या शेंगा जोडी-जोडीने गुच्छांनी झाडावर लटकू लागतात. या शेंगाच आपले लक्ष वेधून घेतात. जुन्या मोठ्या सप्तपर्णीच्या झाडावर शेंगा लागडल्यावर ही झाडे जरा वेगळीच दिसतात. अजून काही दिवसांनी या शेंगा वळून फुटतात व त्यातील पांढऱ्या मिशा असलेल्या बिया वाऱ्यावर उडून जातात.
बाह्य दुवा
https://www.britannica.com/plant/Apocynaceae
संदर्भ
वृक्षराजी मुंबईची:विजय सोमण
प्रकाशक:मुग्धा कर्णिक