Jump to content

सातपुडा विकास मंडळ, पाल

१९ जानेवारी २०१७ खान्देशाला रचनात्मक कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्ति यांची एक प्रसिद्ध परंपरा आहे. महात्मा गांधीनी रचनात्मक कार्यांची संकल्पना मांडली आणि देशभरात हजारो कार्यकर्ते त्या दिशेने वाट चालू लागले. त्यातून अनेक संस्था निर्माण झाल्या. त्याच परंपरेतील एक सेवाभावी संस्था म्हणजे सातपुडा पर्वतातील आदिवासींच्या विकासासाठी काम करणारे 'सातपुडा विकास मंडळ, पाल' ही होय. गेली त्रेसष्ठ वर्षे म्हणजे सहा दशकाहुनही अधिक काळ ही संस्था त्या भागात कार्यरत आहे. सातपुडा पर्वताच्या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या जीवनातील अंध:कार दूर होऊन त्यांच्या जीवनात प्रकाशाचे किरण पोचविण्यासाठी संस्थेची अखंड धडपड चालू आहे. संस्थेची अधिक माहिती खालील प्रमाणे १. संस्थेचा इतिहास २. संस्थेचे कार्य

     १. शैक्षणिक 
     २. कृषिविषयक 
     ३. आरोग्य 
     ४. इतर विकास कामे 
     ५. पुरस्कार 

१. संस्थेचा इतिहास

 थोर स्वातंत्र्य सेनानी धनाजी नाना चौधरी व भाऊसाहेब बोन्डे हे खिरोदा येथे राष्ट्रीय शाळेमार्फत काम करीत होते. त्याच वेळी त्यांचा विचार होता की पाल परिसरातातील आदिवास्यांसाठी काहीतरी विकासात्मक काम करावे. पण स्वातंत्र्याचे आंदोलन जोरावर असल्याने त्यांना ते शक्य झाले नाही. महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर तत्कालीन मुंबई सरकारने अंत्योदयाचे काम करण्यासाठी गांधीजींच्या स्मरणार्थ 'सर्वोदय योजना' सुरू केली. पूर्व खान्देशची सर्वोदय योजनेची जवाबदारी धनाजी नानांवर सोपवण्यात आली. त्यातील पाल व त्या सभोवतालच्या परिसरातील आदिवासी  वस्ती असलेले २५ खेडी निवडली. त्या गावात शिक्षण, शेती, आरोय व दळणवळण अशा क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना तयार करून राबविण्यात आल्या. त्याकाळात आदिवासी मंडळींचे फार मोठ्या प्रमाणावर शोषण केले जात होते. जंगले ठेकेदार व सावकार यांच्या चरकात ते पिळवटून निघत होते. त्याच्या जोडीला रोगराईमुळे ही आदिवासी मांडळी त्रस्त होऊन गेलेली  होती. सर्वोदय योजनांच्या कार्यामुळे हळूहळू ते त्या दानवी पाशातून बाहेर पडू लागले. त्यामुळे शोषणकर्ते दुखावले गेले. त्यातून २९ डिसेंबर १९५२ रोजी धनाजी नानांची हत्या घडवून आणली होती. धनाजी नानांची हत्या घडवून आणण्यामागील मुख्य हेतू आदिवास्यांच्या काम थांबविणे हा होता. धनाजी नानांच्या हत्येनंतर जून १९५३ मध्ये सर्वोदय योजनेची जवाबदारी नुकतेच एम. कॉम. झालेल्या बाळासाहेब ताठ, मधुकरराव चौधरी यांनी स्वीकारली.