सागरिका घोष
सागरिका घोष | |
---|---|
सागरिका घोष (२००५) | |
जन्म | सागरिका घोष ८ नोव्हेंबर १९६४ नवी दिल्ली, भारत |
निवासस्थान | नवी दिल्ली |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
शिक्षण |
|
पेशा | पत्रकार |
मालक | द टाइम्स ग्रुप |
जोडीदार | राजदीप सरदेसाई (ल. १९९४) |
सागरिका घोष (जन्म: ८ नोव्हेंबर १९६४) या एक भारतीय पत्रकार, स्तंभलेखक आणि लेखिका आहेत.[१][२] १९९१ पासून त्या पत्रकार आहेत आणि टाइम्स ऑफ इंडिया, आउटलुक आणि द इंडियन एक्सप्रेसमध्ये त्यांनी काम केले आहे. बीबीसी वर्ल्डसाठी क्वेशन टाइम इंटरनेट या कार्यक्रमात त्या प्राइम टाइम अँकर होत्या, तसेच सीएनएन आयबीएनच्या त्या उपसंपादक देखील होत्या.
घोष यांना पत्रकारितेत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्या दोन कादंबऱ्यांच्या लेखिकाआहेत. इंदिरा गांधी यांचे चरित्र, "इंदिरा: भारताचे सर्वात शक्तिशाली पंतप्रधान" हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. सध्या त्या द टाइम्स ऑफ इंडियाच्या सल्लागार संपादिका आहेत.[३] २०२२ मध्ये भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे त्यांनी लिहलेले चरित्र प्रसिद्ध झाले.[४]
संदर्भ
- ^ "Strategy to breach BJP-mukt South India can't rely on Hindu card, Modi". Times of India Blog (इंग्रजी भाषेत). 2018-05-06. 2022-03-05 रोजी पाहिले.
- ^ "Buy Sagarika Ghose Books & Novels Online | HarperCollins India". HarperCollins Publishers India. 2022-03-05 रोजी पाहिले.
- ^ "Chanakya's not 21st century: Misuse of power in Karnataka cannot be justified as an ancient art of politics". Times of India Blog (इंग्रजी भाषेत). 2018-05-23. 2022-03-05 रोजी पाहिले.
- ^ "A deep dive research into Vajpayee's life". The Sunday Guardian Live (इंग्रजी भाषेत). 2022-01-01. 2022-03-05 रोजी पाहिले.