Jump to content

साखा प्रजासत्ताक

साखा प्रजासत्ताक
Республика Саха (Якутия)
Саха Өрөспүүбүлүкэтэ
रशियाचे प्रजासत्ताक
ध्वज
चिन्ह

साखा प्रजासत्ताकचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
साखा प्रजासत्ताकचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हाअतिपूर्व
स्थापना२७ एप्रिल १९२२
राजधानीयाकुत्स्क
क्षेत्रफळ३१,०३,२०० चौ. किमी (११,९८,२०० चौ. मैल)
लोकसंख्या९,५८,५२८
घनता०.३१ /चौ. किमी (०.८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२RU-SA
संकेतस्थळhttp://www.sakha.gov.ru

साखा प्रजासत्ताक (रशियन: Респу́блика Саха́ (Яку́тия); साखा: Саха Өрөспүүбүлүкэтэ) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. रशियाच्या पूर्व भागात सायबेरियामध्ये ३०,८३,५२३ चौरस किमी क्षेत्रफळाच्या जमिनीवर वसलेला साखा हा जगातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. जर वेगळा देश असता तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने साखाचा क्रमांक भारताच्या खाली व आर्जेन्टिनाच्या वर लागला असता. साखा प्रजासत्ताकाची लोकसंख्या केवळ ९.५ लाख असून ह्यांपैकी १/३ लोक राजधानी व प्रमुख शहर याकुत्स्क येथे वास्तव्य करतात.

लेना ही येथील प्रमुख नदी असून बव्हंशी वाहतूक नदीद्वारे केली जाते. साखाच्या उत्तरेस आर्क्टिक महासागराचे लापतेवपूर्व सायबेरियन हे दोन समुद्र आहेत.

बाह्य दुवे