साखर
साखर अन्न म्हणून वापरले जाते. जे गोड, लहान, विद्रव्य कर्बोदकांमधे, बनलेले आहे. ते आहेत. साखरेचे विविध प्रकार आहेत. साधी साखर, फळांपासून तयार केलेली साखर. दाणेदार साखर सर्वात जास्त वापरली जाते. इतर पदार्थ देखील गोड असू शकतात, पण साखर म्हणून वर्गीकृत केलेले नाही. सर्व झाडांच्या उतित साखर आढळते, ऊस आणि बीट मद्धे साखर मोठ्या प्रमाणात आढळते. ऊस ही गवताची एक जात असून ती उष्ण कटिबंधीय हवामानामध्ये लागवड केली जाते. दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया मध्ये प्राचीन काळापासून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. १८ व्या शतकात वेस्ट इंडीज आणि अमेरिकेमधील साखर उत्पादनात एक महान लागवड स्थापना घडली. या पूर्वी गोड पदार्थ तयार करणे किंवा होणे मध्ये अवलंबून राहावे लागत होते. सामान्य लोकांना गोड पदार्थ उपलब्ध झालेलि ही पहिलीच वेळ होती. १९ व्या शतकात साखर एक थंड हवामानात मूळ पीक म्हणून घेतले जाऊ लागले आणि साखर काढण्यासाठी पद्धती उपलब्ध झाल्याने तेव्हापासून आजपर्यंत साखर उत्पादन हा प्रमुख उपजीविकेचा स्रोत बनला आहे.साखर उत्पादन व्यवसायामुळे व्यापारी वसाहती निर्मिती झाल्या, कामगार संक्रमण, लोक स्थलांतर, असे अनेक बदल घडले. [१] A
रासायनिक गुणधर्म
साखर हा डायसॅकेराइड प्रकारातील पिष्टमय पदार्थ आहे. तिचे रासायनिक नाव सुक्रोज असे आहे.
दाणेदार साखरेचे पोषक तत्त्व (१०० ग्रॅम मध्ये)
तत्त्व | अंश (१०० ग्रॅम मध्ये) |
---|---|
उष्मांक | ३८७ किलो कॅलरी |
पिष्टमय पदार्थ | ९९.९८ ग्रॅम |
- शर्करा | ९९.९१ ग्रॅम |
- तंतुमय पदार्थ | ०.० ग्रॅम |
स्निग्ध पदार्थ | ० ग्रॅम |
प्रथिने | ०.० ग्रॅम |
जलांश | ०.०३ ग्रॅम |
ब २ जीवनसत्त्व (रायबोफ्लेवीन) | ०.०१९ मिलीग्रॅम |
कॅल्शियम | १ मिलीग्रॅम |
लोह | ०.१ मिलीग्रॅम |
पॉटॅशियम | २ मिलीग्रॅम |
प्रकार
- ऊस
- बीट
- अन्य
इतिहास
शरीर व आरोग्यावर परिणाम
साखर जेव्हा ऊसात असते, तेव्हा स्युक्रोजबरोबर त्यांत मॅग्नेशिअम, कॅल्शिअम आणि फॉस्फरस हे ३ महत्त्वाचे घटक असतात. ऊस पिळून रस काढल्यावरही हे घटक त्यांत शाबूत असतात. जेव्हा त्याचं शुद्ध स्फटिकांत रिफाईंड साखरेमध्ये रूपांतर होते, तेव्हा हे ३ घटक त्यांतून नष्ट होतात[ संदर्भ हवा ]. या ३ घटकांची मानवी शरीराला साखरेच्या पचनासाठी नितांत आवश्यकता असते. आपण ही साखर जेव्हा खातो तेव्हा हे ३ घटक शरीरातील राखीव साठ्यातून शोषले जातात[ संदर्भ हवा ] - उदा. कॅल्शिअम दातांतून/ हाडांतून वगैरे. यामुळे हाडे ठिसूळ होणे, दात खराब होणे, यांचे प्रमाण वाढते. स्नायूंच्या निर्मितीसाठी प्रथिनांची गरज असते; पण स्नायूंच्या हालचालींसाठी कॅल्शिअमची गरज असते. हे क्षार जर साखरेच्या पचनासाठी सतत वापरले गेले, तर त्यांच्या मुख्य कार्यावर परिणाम झाल्याने आरोग्य बिघडत.[ संदर्भ हवा ].
कृत्रिम साखर
न्यूट्रासीट
ॲस्पार्टेम
सूक्रॅलोज
स्टिव्हिया
- ^ भारतातील साखर कारखान्याच्या माहिती साठी शुगर इंडिया बुक हे संदर्भ पुस्तक दरवर्षी जयसिंगपूर येथून प्रकाशित होते, http://www.anekantprakashan.com/ Archived 2019-08-28 at the Wayback Machine.