Jump to content

सांता बार्बरा रेल्वे स्थानक

सांता बार्बरा रेल्वे स्थानकाच्या १ क्रमांकाच्या फलाटावर येणारी पॅसिफिक सर्फलायनर गाडी

सांता बार्बरा रेल्वे स्थानक अमेरिकेच्या कॅलिफॉर्नियामधील सांता बार्बरा शहरातील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक सान डियेगो-लॉस एंजेलस-सान होजे-पोर्टलँड-सिअ‍ॅटल रेल्वेमार्गावर आहे. कोस्ट स्टारलाईट आणि पॅसिफिक सर्फलायनर या दोन रेल्वे गाड्या येथे थांबतात. कोस्ट स्टारलाइट लस एंजेलस आणि सिअॅटल दरम्यान रोज एकदा धावते तर पॅसिफिक सर्फलायनर सान डिएगो आणि गोलेटा या सांता बार्बराच्या उपनगरादरम्यान दररोज प्रत्येक दिशेने पाच वेळा धावतात. त्यांपैकी दोन उत्तरेकडे सान लुईस ओबिस्पोपर्यंत जातात.

सांता सांता बार्बरा रेल्वे स्थानकावर तिकीटविक्री आणि सामान चढविण्या-उतरविण्यासाठी कर्मचारी उपलब्ध असतात..

१९१० च्या पोस्टकार्डमधील सांता बार्बरा स्थानक
२००० मध्ये झालेल्या नूतनीकरणानंतर २००७ मध्ये स्थानक

कॅलिफोर्निया मधील ७४ अॅमट्रॅक स्थानकांपैकी, सांता बार्बरा हे १५वे सर्वात व्यस्त स्थानक होते (२०१२). दररोज सरासरी ८३४ प्रवासी येथून ये-जा करतात. या वर्षी एकूण ३,०४,३८२ प्रवासी या स्थानकात आले-गेले. []

संदर्भ

  1. ^ "Amtrak Fact Sheet, FY2012, State of California" (PDF). Amtrak. November 2012. 2013-05-11 रोजी पाहिले.