सांता क्लारा काउंटी (कॅलिफोर्निया)
सांता क्लारा काउंटी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक काउंटी आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १९,३६,२५९ इतकी होती. ही काउंटी सान फ्रान्सिस्को बे एरियाचा एक भाग आहे. सांता क्लारा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र सान होजे येथे आहे. सांता क्लारा काउंटीमध्ये उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांची मुख्यालये आहेत. सिलिकॉन व्हॅलीचा भाग गणला जाणाऱ्या या काउंटीमध्ये ह्युलेट-पॅकार्ड, गूगल, ॲपल, व्हीएमवेर, इंटेल, एनव्हिडिया, एएमडी, सिस्को आणि इतर अनेक कंपन्याची मुख्यालये आणि आवारे आहेत. या काउंटीचे दरडोई उत्पन्न झ्युरिक आणि ऑस्लोच्या मागोमाग जगात तिसऱ्या क्रमांकाचे होते.[१] वॉशिंग्टन डी.सी. नंतरचे धनाढ्य लोकांचे हे वस्तीस्थान समजले जाते.[२] and one of the most affluent places in the United States.[३][४]
सांता क्लारा काउंटीला १७७७ मध्ये स्थापन झालेल्या मिशन सांता क्लारा दि असिसवरून नाव दिलेले आहे.[५]
हे सुद्धा पहा
संदर्भ आणि नोंदी
- ^ Silicon Valley Business Journal – San Jose Area has World's Third-Highest GDP Per Capita, Brookings Says
- ^ "The 20 wealthiest counties in the U.S., including these Washington, DC, suburbs: Report". Fox Business. December 18, 2019.
- ^ "Richest Counties In The United States". April 25, 2017.
- ^ Levy, Francesca (March 4, 2010). "America's 25 Richest Counties". Forbes.
- ^ Shortridge, Charles Morris (1895). Santa Clara County and Its Resources: Historical, Descriptive, Statistical : a Souvenir of the San Jose Mercury : 1895. San Jose Mercury Pub. & Print. Company. p. 16.