Jump to content

सांचोरी गाय

सांचोरी गाय हा शुद्ध भारतीय गोवंश असून, याचे मूळ भारतातील राजस्थान प्रांतातील सांचोर जिल्ह्यातील रानीवाडा, चीतलवाना तसेच जालोर जिल्ह्यातील भिनमल, बागोडा आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आढळतो.[] भारतीय कृषी संशोधन परिषद ने दुहेरी हेतूचा गोवंश म्हणून याचे प्रमाणीकरण केले आहे.[].

शारीरिक रचना

हा गोवंश कांकरेज गायी पासून उतपन्न झालेला असल्याने कंकरेजशी मिळताजुळता दिसतो. या गोवंशाचा रंग सहसा पांढरा असून काही प्रमाणात राखाडी देखील सापडतो. या गोवंशाची शिंगे गोल, प्रथम बाहेरून वरच्या दिशेने वळलेली, तर शिंगाची टोके वर आतील दिशेने वळलेली असतात. या गोवंशाचा चेहरा मध्यम लांबीचा असतो. तर कपाळ बऱ्यापैकी रुंद आणि किंचित अवतल असते. शारीरिक बांधा मध्यम असून कांकरेजशी मिळताजुळता असतो.[][]

वैशिष्ट्ये

सांचोरी गुरे राजस्थान प्रांतातील रुक्ष आणि उष्ण तापमानासाठी अनुकूल असतात. दूध उत्पादनाच्या दृष्टीने मध्यम ते चांगले दूध उत्पादक असून बैल शेतीसाठी आणि कष्टकरी कामासाठी चांगले असतात. भारतीय कृषी संशोधन परिषद ने प्रमाणीकरण केल्या प्रमाणे हा दुहेरी हेतूचा गोवंश म्हणून ओळखला जातो.[] या गोवंशाची गाय प्रतिदिन १५ ते १६ लिटर पर्यंत दूध देते. तर एका वेतात २७०० ते २८०० लिटर पर्यंत दूध मिळते. यामुळे हा गोवंश राठी आणि थारपारकर च्या बरोबरीचा मानला जातो.[]

भारतीय गायीच्या इतर जाती

भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ "राजस्थान में गायें | गायों की नस्ल".
  2. ^ a b "Registered Breeds Of Cattle" (इंग्रजी भाषेत). १ मार्च २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "Sanchori Cattle" (इंग्रजी भाषेत). १ मार्च २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ a b "सांचोरी गाय की संपूर्ण जानकारी पढ़ें". animall.in. १ मार्च २०२४ रोजी पाहिले.