सांचीचा स्तूप
सांचीचा स्तूप हा भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यातील सांची गावातील एक बौद्ध स्तूप आहे. सांची हे भोपाळपासून ४५ कि.मी. तर विदिशापासून ९ कि.मी. अंतरावर आहे. सांचीचा स्तूप हा मौर्य सम्राट अशोकांनी बांधलेला आहे.
इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात अशोक राजाने बांधलेले, संपूर्णपणे विटांचे बांधकाम असलेले हे स्थापत्य फारच सुंदर आहे. हा स्तूप म्हणजे एक स्मारक होय. गौतम बुद्धाच्या अस्थी किंवा त्याचे काही अवशेष एका पेटीमध्ये जपून ठेवले जात असत, आणि त्या पेटीवर स्मारक म्हणून भव्य अशा स्तूपाचे बांधकाम केले जाई. सांचीचा स्तूप हे पण असेच एक स्मारक आहे.
या सांचीच्या स्तूपाच्या माथ्यावर छत्रावली आहे. इ.स.पूर्व पहिल्या शतकात सातवाहन साम्राज्याच्या कालखंडात या स्तूपाच्या बाजूने भव्य शिल्पांकित अशी तोरणे बांधली गेली आणि त्या स्तूपाभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी एक सुंदर प्रदक्षिणापथ तयार करण्यात आला. येथील तोरणांवर गौतम बुद्धांच्या आयुष्यातील विविध प्रसंग कोरलेले आहेत. सांची इथली ही तोरणे आणि त्यावर केलेले शिल्पकाम उत्तमप्रकारे केलेले आहे. या तोरणांवर असलेल्या ब्राह्मी लिपीमधील शिलालेखानुसार महाराष्ट्रातील कोणा आनंद नावाच्या व्यापाऱ्याने यासाठी देणगी दिल्याचा उल्लेख आढळतो.
भूगोल व जनसांख्यिकी- उदयगिरी पासून साँची जवळच आहे. येथे बौद्ध स्तुप आहे सगळ्या स्तुपांची कला प्रख्यात आहे. येथे रेल्वे मार्ग, बस मार्ग ने जाता येते. रेल्वे मार्गाने येताना विदीशा या गावात उतरावे लागते तसेच हवाई मार्गाने येताना भोपाळला उतरावे लागते व तेथून बस ने साँचीला जाता येते.
चित्रदालन
- स्तूप क्र.३, सांची.
- सांची, २००३.
- उत्तरेकडचे द्वार.
- बुद्धाच्या शिष्यांचा स्तूप, सांची
- स्तूपाचे एक रेखाचित्र व आरेखन.
- तेथील एक बगीचा
- सांची येथील एक मठ.
- सांचीच्या स्तूपास भेट देताना बुद्धभिक्षू.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- युनेस्कोच्या यादीवर सांचीचा स्तूप (इंग्रजी मजकूर)
बौद्ध तीर्थस्थळे |
---|
चार मुख्य स्थळे |
चार अतिरिक्त स्थळे |
इतर स्थळे |
|
नंतरची स्थळे |
|