सव्हाना (जॉर्जिया)
सव्हाना Savannah | |
अमेरिकामधील शहर | |
सव्हाना | |
सव्हाना | |
देश | अमेरिका |
राज्य | जॉर्जिया |
स्थापना वर्ष | इ.स. १७३३ |
क्षेत्रफळ | २८१.५ चौ. किमी (१०८.७ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ४९ फूट (१५ मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | १,३६,२८६ |
- घनता | ८२३.६ /चौ. किमी (२,१३३ /चौ. मैल) |
- महानगर | ३,४७,६११ |
प्रमाणवेळ | यूटीसी - ५:०० |
savannahga.gov |
सव्हाना (इंग्लिश: Savannah) हे अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर व तिसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे. सव्हाना शहर जॉर्जियाच्या पूर्व भागात साउथ कॅरोलायना राज्याच्या सीमेवरील सव्हाना नदीच्या मुखाजवळ व अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. ब्रिटिशकालीन साम्राज्यात असताना सव्हाना जॉर्जिया प्रांताची राजधानी होती. येथील ऐतिहासिक वास्तूशास्त्रासाठी प्रसिद्ध असलेल्या सव्हानामध्ये अनेक जुन्या इमारती व चर्चे आहेत. ह्यांसाठी सव्हानाला जॉर्जियाच्या पर्यटन नकाशावर मानाचे स्थान आहे.