सर्पाकृती दाबकलम
सर्पाकृती दाबकलम हा दाबकलमाचा एक प्रकार आहे. यात झाडाची फांदी दोन तीन ठिकाणी मातीत गाडून त्यापासून एकाच वेळेला 3-4 दाबकलमे मिळू शकतात. फांदीला जिथे मुळया फोडावयाच्या आहेत तिथे जिभलीसारखा काप किंवा त्या भोवतालची साल काढून टाकतात. मुळया फुटल्यावर मातृवृक्षाच्या फांदीपासून ती कलमे अलग करतात. अशा रीतीने एकाच फांदीपासून 3-4 कलमे एकाच वेळी मिळतात.ज्या झाडांच्या जमिनीपासून वेलासारख्या लांब फांद्या मिळतात अशी द्राक्षे, शोभेच्या वेली यांची अभिवृद्धी या पद्धतीने करतात.