सर्जेकोट
सर्जेकोट | |
नाव | सर्जेकोट |
उंची | {{{उंची}}} |
प्रकार | गिरिदुर्ग भुईकोट किल्ला |
चढाईची श्रेणी | {{{श्रेणी}}} |
ठिकाण | जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | |
डोंगररांग | {{{डोंगररांग}}} |
सध्याची अवस्था | |
स्थापना | {{{स्थापना}}} |
सर्जेकोट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
भौगोलिक स्थान
कसे जाल ?
मालवणहून एसटीने सर्जेकोटला जाता येते. सर्जेकोट स्टॉपपासून १० मिनिटात चालत किल्ल्यावर पोहोचता येते. सर्जेकोट पंचक्रोशी मच्छीमार सहकारी सोसायटी पासून डाव्या हाताने जाणाऱ्या रस्त्याने थेट किल्ल्यात जाता येते. मालवणहून रिक्षा ठरवूनही किल्ल्यावर जाता येते. मालवण - सर्जेकोट अंतर ४ किमी आहे.
इतिहास
शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी राजकोट, पद्मगड आणि सर्जेकोट हे उपदुर्ग बांधले. त्यातील सर्जेकोट हा किल्ला तलाशिल-सर्जेकोट गाव खाडीच्या मुखावर बांधलेला आहे. वेडीवाकडी वळणे असलेल्या कोळंब नदीच्या खाडीत पावसाळ्यात महाराजांच्या आरमारातील जहाजे नांगरून ठेवली जात असत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६६८ मध्ये हा किल्ला बांधला.
छायाचित्रे
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
सर्जेकोट गडाच प्रवेशद्वार छोटस पण कमानदार आहे. प्रवेशद्वाराच्या बाजूला बुरुज आहे. आतल्या बाजूला घरे आहेत. त्यांच्या कडेने चालत गेल्यास आपण बालेकिल्ल्यापाशी पोहोचतो. बालेकिल्ल्याचे चारही बुरुज व तटबंदी शाबुत आहे. प्रवेशद्वार नष्ट झालेले आहे. बालेकिल्ल्यात विहिर, तुळशी वृंदावन व तटावर जाण्याचे जिने आहेत. बालेकिल्ल्यात झाडी माजली असल्यामुळे इतर अवशेष दिसत नाहीत. किल्ल्याच्या समुद्राकडील बाजुची तटबंदी व बुरुज शाबुत आहेत.
गडावरील राहायची सोय
गडावर राहण्याची सोय नाही, पण मालवणात आहे.
गडावरील खाण्याची सोय
गडावरील पाण्याची सोय
संदर्भ
- सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
- डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
- दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
- किल्ले - गो. नी. दांडेकर
- दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
- ट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया
- सह्याद्री - स. आ. जोगळेकर
- दुर्गकथा - निनाद बेडेकर
- दुर्गवैभव - निनाद बेडेकर
- इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
- महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर
हे सुद्धा पहा
- भारतातील किल्ले